“२०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार”; संजय राऊत

“२०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार”; संजय राऊत

पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी कोठडीत नुकतेच जामिनावर बाहेर आलेलं, शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. राऊतांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आणि २०२४ पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मी बाहेर असो वा नसो पण २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही. सध्याच राजकीय वातावरण अस्थिर आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

महेश बाबूचे वडील कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका, आईने २ महिन्यांपूर्वी घेतला होता अखेरचा श्वास

कालच्या शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाच्या झालेल्या राड्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, असे प्रकार नारायण राणे सोडून गेले तेव्हा त्यांच्या तिथेही अशा राड्याच्या घटना घडत होत्या. आज ते कुठे आहेत. आज ते कुठे आहेत. आज तिथे शिवसेना आहे. ठाण्यातसुद्धा आज शिवसेना आहे. आपली सत्ता आहे. पोलिस यंत्रणा आपल्याकडे आहे. पैशांची ताकद आहे. म्हणून आपण शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल शिवसैनिकांच रक्त सांडणार असाल तर हे चालणार नाही. शिवसैनिकांच रक्त इतकं स्वस्त नाही हे लक्षात घ्या. गेल्या ५० वर्षात शिवसैनिकांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब द्यावा लागणार आहे असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे असताना संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी नमूद केलं आहे.

दहिसर येथे प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक झाल्यानं खळबळ!

Exit mobile version