spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘लाडकी बहीण योजना’ वरून संजय राऊतांनी सरकारवर केला हल्लबोल, म्हणाले…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अश्यातच एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अश्यातच एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारने काही दिवसांआधी ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेचा लाखो महिलांनी लाभ देखील घेतला आहे. अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. याच योजनेवरून विरोधी पक्ष मात्र सरकारला चांगलंच घेरल आहे.

१ हजार ५०० रुपये देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, अशा शब्दात शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेत निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या ‘लाडली बहन’ योजनेला बोगस बोलले होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टॅंडर्डचे लोक आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मानसिक संतुलनाबाबत आम्हाला चिंता लागली आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य मग झारखंडमध्ये योजना बोगस कशी? हे भाजपच्या लोकांचं सडक डोकं आहे. मी पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही. पण मोदींचं हे विधान आहे, असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस जातात तिकडे त्यांना बंगला मिळत आहे. त्यांचं आणि बंगल्याचं काय रहस्य आहे मला कळत नाही… महाराष्ट्रात मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना एकच बंगला मिळतो. इथे तर त्यांनी तीन तीन बंगले घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तीन बंगले घेतलेत. दिल्लीत बंगला वाटप सुरू आहे. त्याचा एकदा ‘भूत बंगला’ होणार आहे. एवढे बंगले घेतले आहेत. निवडणूक हरल्यावर सर्व भुतासारखं फिरणार आहेत. कशाला आणि मला कळत नाही यांना एवढे बंगले देत आहेत. भाजपचं सगळंच कठीण आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss