राऊतांनी मनसेला डिवचले, त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष…

काल दि. ९ मार्च रोजी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी अनेकांवर हल्लाबोल हा केला आहे.

राऊतांनी मनसेला डिवचले, त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष…

काल दि. ९ मार्च रोजी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी अनेकांवर हल्लाबोल हा केला आहे. तसेच राज ठाकरे यांनी काल उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल हा केला होता आणि त्या वेळी ते म्हणाले होते की, आमच्या वाट्याला गेले, मुख्यमंत्रीपद गेले. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चांगलाच समाचार घेतलं आहे. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना चांगलं माहीत आहे. तसेच मनसेला पक्षाची वाढ करण्याची अजून गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आज सकाळी संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते. तेव्हा संजय राऊत म्हणाले, त्यांच्या वाटेला जाण्या इतका त्यांचा पक्ष मोठा नाहीये. सरकार का गेलं हे अख्ख्या जगाला माहीत आहे. त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सरकार फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. आणि जोडीला खोके होतेच. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना मी सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त ईडीचा अनुभव घेऊनही आमच्या तोफा आणि कार्य सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तसेच माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरही भाष्य केलं. हे सरकार कधीही कोसळेल. कोर्टात जे प्रकरण सुरू आहे. जे आमदार पक्ष सोडून गेले ते निलंबित होतील. त्यातील १६ निलंबित होतील. त्यानंतर सरकार जाईल. त्यामुळे सरकार राहणार नाही आणि फडणवीस राहणार नाही. या बजेटमध्ये आहेच काय? सर्व खोटं आहे. सरकार कोसळण्याच्या भीतीने बजेट सादर केलं. कदाचित या सरकारचं हे शेवटचं बजेट असेल. घटनेनुसार निर्णय लागला आणि लागेलच आणि १६ आमदार अपात्र ठरेल तर सरकार कोसळेल. सरकार कोसळल्यास लोकांमध्ये जाण्यासाठी थापेबाजीचं बेजट सादर करण्यात आलंय, अशी टीका त्यांनी केली. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील, केंद्रातील सरकारने जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण केलं आहे . महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण प्रत्येक ठिकाणी जात दाखवण्याचं काम सरकार करत आहे. शेवटी महाराष्ट्रातील बारा कोटीच्या लोकांना त्यांचा धर्म दाखवावा लागेल. महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला

हे ही वाचा : 

Shivjayanti 2023, शिवजयंतीनिमित्ताने जाणून घ्या शिवजयंतीचे महत्व

Shivjayanti 2023, जाणून घ्या कर्तृत्ववान शिवरायांच्या काही खास गोष्टी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version