Sanjay Raut: खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल; आदित्य ठाकरे – संजय राऊतांची गळाभेट

१०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मातोश्रीवर (Matoshri) दाखल झाले. शिवसैनिकांचा मोठा ताफा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अन् मातोश्रीच्या गेटवर स्वागतासाठी थांबलेले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)… संजय राऊत यांचा ताफा मातोश्रीच्या आवारात दाखल झाला.

Sanjay Raut: खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल; आदित्य ठाकरे – संजय राऊतांची गळाभेट

१०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मातोश्रीवर (Matoshri) दाखल झाले. शिवसैनिकांचा मोठा ताफा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अन् मातोश्रीच्या गेटवर स्वागतासाठी थांबलेले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)… संजय राऊत यांचा ताफा मातोश्रीच्या आवारात दाखल झाला. शिवसैनिकांच्या गर्दीतून वाट काढत संजय राऊत पुढे गेले अन् आदित्य ठाकरे यांनी त्यांना कडकडून मिठी मारली.

बुधवारी, संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. आर्थर रोड तुरुंग ते राऊत यांच्या निवसास्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर भांडूप येथील घराजवळ शिवसैनिकांना संबोधित करताना आपण मरेपर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राऊत हे गुरुवारी सकाळी मातोश्रीवर जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जेलमधून बाहेर आल्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची ही पहिलीच भेट असल्याने या भेटीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी वडिलकीच्या नात्यातून संजय राऊत यांचा हात आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर होता. दोघेही गळ्यात गळे घालूनच मातोश्रीकडे निघाले…

मातोश्रीच्या आवारात जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी हे दृश्य पाहिलं. संजय राऊत यांच्यावर आरोप होत असताना ठाकरे कुटुंब त्यांना मदत करणार नाही, त्यांच्या पाठिशी उभे राहणार नाही, असं दबक्या आवाजात बोललं जात होतं. मात्र ठाकरे कुटुंबियांसाठी संजय राऊत किती महत्त्वाचे आहेत, हे या दृश्यावरून स्पष्ट दिसतंय.

संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ठाकरे कुटुंबीय हे राऊत कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहिले होते. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली होती. नवरात्रौत्सवात ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी जातानादेखील रश्मी ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेतली होती.

हे ही वाचा :

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut : संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा! म्हणाले, ‘बोलण्याची प्रॅक्टीस…’

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान मोदी राज्यातील युवकांचा रोजगार हिरावून घेत आहेत ; राहुल गांधींचा हल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version