Sanjay Raut : राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या जामिनाला ईडीनं (ED) विरोध केला आहे. आज संजय राऊत यांच्या वकिलांकडून कोर्टात त्यांची बाजू मांडली जाणार आहे.

Sanjay Raut : राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या जामिनाला ईडीनं (ED) विरोध केला आहे. आज संजय राऊत यांच्या वकिलांकडून कोर्टात त्यांची बाजू मांडली जाणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर ११ ऑक्टोबरला सुनावणी झाली होता. मात्र, वेळेअभावी त्यांचा युक्तिवाद पूर्णपण होऊ शकला नव्हता. त्यामुळं सुनावणी १७ ऑक्टोबरला घेण्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा एक दिवसानं सुनावणी पुढे ढकलत १८ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा : राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग; संजय राऊत

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या सर्व प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीने (ED) केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून १,०३९. ७९ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून १०० कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. २०१० साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी ८३ लाख रुपये जमा केले होते.

हे ही वाचा:

सध्याचं राजकारण हे कॉलेजमधील तरुण-तरुणी एकमेकांना जशा शिव्या घालतात, तसं झालंय; अभिजीत बिचुकले

भारत जोडो यात्रा ७ नाव्हेंबरला महाराष्ट्रात; काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version