spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केंद्र व राज्याकडून बक्षिस?”, मंत्री लोढांच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Tourism Minister Mangalprabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झालाय. अनेकांनी लोढा यांच्या या विधानाना निषेध केलाय. राज्यात काही ठिकाणी ठाकरे गटाकडून लोढा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विषयी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : 

World Aids Day 2022 : आजाराला न घाबरता सामोरे जा, HIV आणि AIDS बद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक एड्स दिन’

संजय राऊत म्हणाले की, छत्रपतींचा अवमान करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. या लोकांना आता ‘करारा जवाब मिलेगा.’ राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही काल छत्रपतींचा अवमान केला. परराज्यातून आणि परदेशातून ज्या छत्रपतींचा इतिहास बघण्यासाठी लोक येतात त्याच खात्याच्या मंत्र्यांना महाराजांचा इतिसाह माहिती नसणं दुर्दैवी आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले, सध्याचे या खोके सरकारमध्ये कोण छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati shivaji maharaj) जास्त अपमान करेल अशी स्पर्धा लागली आहे. त्यांच्यावर दिल्लीनं मोठं बक्षीस लावलंय का? असा सवालही राऊतांनी केला. रोज भाजपचा एक माणूस छत्रपतींचा अपमान करत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० खोके आमदार गप्प आहेत. छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का? असा सवाल राऊतांनी शिंदे सरकारला केला. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? छत्रपतींच्या आग्रा सुटकेची तुलना तुम्ही एका बेईमान व्यक्तिशी करत असाल तर तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल असे राऊत म्हणाले.

युती नवी, मात्र वाद जुने ठाकरे गट व संभाजी ब्रिगेड यांच्यात सावरकरांवरून मतभेद

कॅबिनेटने राज्यपालांच्या विरोधात निषेध करणारा ठराव मंजूर करावा. मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहावं, हे तरी तुमच्या हातात आहे ना ? असा खडा सवाल राऊतांनी केला. हे लोक राज्याला मूर्ख बनवत आहेत. ही सगळी मांजरं आहेत. मांजर जरी डोळे बंद करुन दूध पीत असले तरी लोक पाहत असतात असे राऊत म्हणाले.

आपल्याला सत्तेत यायचंय, राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार, उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

Latest Posts

Don't Miss