“महाराष्ट्र विरुद्ध दिल्लीचे कारस्थान”, संजय राऊतांची प्रतिक्रिया

ठाणे ,नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली शिवसेनेचे एकूण 40 हून अधिक नगरसेवकांनी गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

“महाराष्ट्र विरुद्ध दिल्लीचे कारस्थान”, संजय राऊतांची प्रतिक्रिया

"महाराष्ट्र विरुद्ध दिल्लीचे कारस्थान", संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : ठाणे नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेनेचे एकूण 40 हून अधिक नगरसेवकांनी गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या राहत्या निवासस्थानी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा केली. आणि त्यानंतर आम्ही शिंदे गटात सामील होत आहोत असे जाहीर केले. कल्याण डोंबिवली पालिकेतील नगरसेवकांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे.

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आताच्या महाराष्ट्रातील स्थितीला पूर्णतः दिल्ली कारणीभूत आहे. महाराष्ट्र विरुद्ध दिल्लीचे हे कारस्थान आहे. पण आम्ही या कारस्थानाला घाबरणार नाही. पुन्हा एकदा शिवसेना जोमाने कामाला लागणार” पक्षचिन्हवर प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे यावर भाष्य करतील असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

शिवालिका ओबेरॉय खुदा हाफिजच्या स्क्रिनिंग वेळी दिसली

“आता आमच्यासाठी आकाश खुले आहे. आता आम्ही झेप घेऊ त्यातूनच महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल. जनता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहतील. मातोश्रीने भरभरून दिले त्याबाबतीत जो प्रकार झाला आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेला नाही” असे संजय राऊत म्हणाले.

ईडीच्या भीतीने काही जणं भाजप सोबत गेले – छगन भुजबळ

Exit mobile version