Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाकडून पुन्हा कुठलाही दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना पुन्हा ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाकडून पुन्हा कुठलाही दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना पुन्हा ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. वेळे अभावी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम अजून वाढला आहे.

संजय राऊत यांनी आज न्यायालयात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आपणही मोठे होऊ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये त्यांना १० ऑक्टोबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज वेळेअभावी त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकलेली नाही. पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा:

शिवीगाळ वगैरे काहीच झालं नाही, तिथे फक्त… ; अब्दुल सत्तारांनी दिलं स्पष्टीकरण

Viral Video : साडी नेसून महिलांचा ‘हुतूतू’, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Mulayam Singh Yadav Died : मुलायमसिंह यादव आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मैत्रीचे काही खास किस्से

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version