Saturday, September 28, 2024

Latest Posts

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

अगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांनी मोचेबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे. राज्यात विविध ठिकाणी राजकीय पक्षांच्या बैठका, सभा, यात्रा आणि दौरे यांचा धडाका सध्या पाहायला मिळत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आघाडीबाबत मोठे वक्तव्य करत ‘भाजप सोडून सगळ्यांसाठी आमची दारे खुली आहेत,’ असे त्यांनी म्हंटले आहे. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (शनिवार, २८ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीबाबत मोठे भाष्य केले आहे. “वंचित बहुजन आघाडीत येण्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत पण आम्ही कोणाकडे जाणार नाही. भाजप सोडून सगळ्यांसाठी आमची दारे खुली आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी ‘प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील. संविधान वाचवण्याच्या कामांमध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळला नाही हे त्यांना सांगायची गरज नाही,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत म्हणाले, “आमच्या मध्ये काहीही भांडण नाही, भांडण व्हायची शक्यता नाही. लोकसभेचे निकाल बाळासाहेब आंबेडकर यांनी पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमूठ मजबूत होती. म्हणून आम्ही या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकलो. जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेस्तनाबूत झाला असता. आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की, आता आपण हट्ट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान वाचवण्याच्या कामांमध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळला नाही, हे आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना सांगायची गरज नाही. त्यांनाही माहिती आहे. कधीही संविधानाला डंक मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर अत्यंत सावधपणे भूमिका घेणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत होईल अशी पावला टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Dharmaveer 2 अत्यंत बोगस, बकवास आणि काल्पनिक सिनेमा: Sanjay Raut

सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंध्यांचे काही चालले नाही, सिनेट निवडणुकीत एकतर्फी विजयानंतर Sanjay Raut यांचा CM Eknath Shinde यांच्यावर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss