spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा – दिपाली सय्यद

शिंदे साहेब आणि ठाकरे साहेबांनी एकत्र येत या सर्व गोष्टींवर बसून चर्चा करावी.

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी काल उशिरा केलेल्या ट्विट मध्ये एकनाथ शिंदे लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी दिपाली सय्यद यांना खडसावत विचारलं की अशी वक्तव्य करण्याचा तुम्हाला कुणी हा अधिकार दिला ? एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत असं म्हणाले. आज दिपाली सय्यद यांनी शिंदे – ठाकरेंच्या भेटीबाबत पत्रकार परिषदेत आपले मत मांडले आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना सध्या शंतातेतचा पवित्रा घ्यावा असे ही म्हंटले आहे.

काय म्हणाल्या दिपाली सय्यद ?
शिवसेनेत पडलेले दोन गट माझ्यासारख्या शिवसैनिकाला मान्य नाही. शिंदे साहेब आणि ठाकरे साहेबांनी एकत्र येत या सर्व गोष्टींवर बसून चर्चा करावी. अनेक शिवसैनिकांना वाटते की त्या दोघांनी एकत्र यायला पाहिजे. वाद आणि मानापमान बाजूला ठेवून शिंदे – ठाकरेंनी एकत्र यावे. तळा गाळातल्या शिवसैनिकांच्या हितासाठी तरी त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. यावेळी मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवत आहे. असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

हेही वाचा

संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा
संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानावर दिपाली म्हणाल्या, राऊत साहेब माझ्यापेक्षा मोठे आहेत. राऊत साहेबांनी शांतपणे विचार करून उद्धव साहेब आणि शिंदे साहेब पुन्हा एकत्र कसे येतील याबाबत विचार करावा. त्यातच सामान्य शिवसैनिकांच हित आहे. संजय राऊत यांनीच पुढाकार घेत दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत असं ही सय्यद म्हणाल्या.

Latest Posts

Don't Miss