Saturday, July 6, 2024

Latest Posts

Ujjwal Nikam यांना BJP ने Loksabha Election साठी फासावर लटकवण्याचं काम केलं: Sanjay Raut

शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऍड उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.

शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (मंगळवार, २५ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऍड उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात (Mumbai North Central Loksabha Constituency) काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याविरुद्ध भाजपच्या ऍड उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला होता. आता यावर संजय राऊत यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करत,” उज्वल निकम यांना भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी फासावर लटकवण्याचं काम केलं आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.

उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “उज्वल निकम हे मोठे वकील आहेत. पण भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी स्वतःवरती एक राजकीय शिक्का मारून घेतला. त्याच्यामुळे त्यांना आता या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल की माझ्यावर जोर जबरदस्ती करून निवडणूक लढवायला भाग पाडलं. जरी कसाबला फाशी देण्यामध्ये माझा हात असला, तरी मला लोकसभा निवडणुकीसाठी फासावर लटकवण्याचं काम भाजपने केलं आहे हे त्यांना समोरून सांगावे लागेल. नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिका पुसता येणं कठीण आहे.”

पुणे ड्रग्स केसबाबत (Pune Drugs Case) मोठे भाष्य करत ते म्हणाले, “पुणे आणि नाशिक ही दोन शहरं पूर्णपणे ड्रग्सच्या विळख्यात गेली आहेत. जस आम्ही उडता पंजाब म्हणतो. बँकॉक, लाओस अशा पद्धतीने पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्स, नाशिकमध्ये हजारो कोटीचे ड्रग्स कुठून येत आहेत. तर गुजरात मधून येत आहे. हे सिद्ध झालं आहे. गुजरात हे ड्रग्स चे सर्वात मोठं केंद्र आहे. मुद्रा पोर्टमध्ये हजारो कोटीचा ड्रग्स उतरत आहेत. काही पकडले जात आहे.. काही महाराष्ट्रात वळवला जात आहे… आणि हे सगळे कोण आहेत? राजकीय संरक्षण कोणाच आहे? याचा तपास होणं गरजेच आहे… हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेला आहे काही वर्षात. त्यांना कोणी संरक्षण दिलं आहे या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते? कोण पोलीस आयुक्त होते? पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे. पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचा सर्वात मोठा केंद्र बनला आहे. पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं आमचं. आज पुण्यात दुर्दैवाने गुन्हेगारी अमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातील होऊ पाहत असेल त्याला जबाबदार  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या त्या वेळेचे पालकमंत्री पुण्यातले आणि आतापर्यंत गेल्या पाच वर्षात जे जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी ते या सगळ्यांला जबाबदार आहे.”

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल, Supriya Sule यांचा विश्वास

Nilesh Lanke यांनी घेतली इंग्रजीमधून शपथ, Sujay Vikhe यांना अप्रत्यक्ष टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss