ज्या कुटुंबानं तुम्हाला इतकी वर्ष भरभरून दिलं त्यांच्याशी गद्दारी केलीत; Ajit Pawar यांना Sanjay Raut यांचा टोला

ज्या कुटुंबानं तुम्हाला इतकी वर्ष भरभरून दिलं त्यांच्याशी गद्दारी केलीत; Ajit Pawar यांना Sanjay Raut यांचा टोला

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील भाष्य केले आहे. “ज्या कुटुंबानं तुम्हाला चाळीस-चाळीस वर्ष भरभरून दिलं, त्यांच्याशी बेईमानी गद्दारी करून तुम्ही बाहेर पडलात. तुम्हाला त्याची आता का खंत वाटते?” असा सवाल राऊतांनी यावेळी करत अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे.

आगामी विधानसभा निवडणुक (Maharashtra Assembly Election 2024) काही महिन्यांवर येऊन ठेपली असून आता निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार (NCP) गटाचे आमदार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmraobaba Atram) यांची मुलगी भाग्यश्री हलगेकर (Bhagyashree Halgekar) हि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar) संपर्कात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर बोलताना “चूकभूल करू नका. बापासोबत राहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहात,” असा सल्ला भाग्यश्री हलगेकर यांना दिला होता. त्यावरून राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज (रविवार, ८ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांवर निशाणा साधत ते म्हणाले, “घरफोडी कोणी केली? पक्षफोडी घरफोडी करणारे अमित शहा आहेत. तुम्ही त्यांना बळी पडलात ते मान्य करा… की तुम्हाला धाक भीती भय दाखवून तुम्हाला फोडलं? ज्या कुटुंबानं तुम्हाला चाळीस – चाळीस वर्ष भरभरून दिलं, त्यांच्याशी बेईमानी, गद्दारी करून जेव्हा तुम्ही बाहेर पडलात ते कशामुळे? तुम्हाला त्याची आता का खंत वाटते? स्वार्थी लोकांना खंत वाटणं हे त्यांचं नाटक असतं, त्यांना खंत, दुःख काही नसतं. ते आपल्यापुरतं पाहतात. त्यांना ना राज्याची, ना समाजाची, ना पक्षाची चिंता, मी माझा आणि बस माझा खोका बरा,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले अजित पवार?

भाग्यश्री हलगेकर शरद पवार गटात प्रवेश घेणार असल्यावर भाष्य करत अजित पवार म्हणाले होते कि, “विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम सुरु आहे. मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मला त्यांना एकच सांगायचं आहे कि, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूकभूल करू नका. बापासोबत राहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहात. हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. त्यासंदर्भात आम्हीदेखील अनुभव घेतला आहे. मी त्यातून माझी चूक मान्य केली. मात्र आता माझे सांगणे आहे कि, वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

तर Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत; BJP आमदार Parinay Fuke यांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version