Saturday, July 6, 2024

Latest Posts

Mahavikas Aghadi ने महाराष्ट्राला BJP मुक्त केलं, Sanjay Raut यांचा घणाघात

शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (सोमवार, १० जून) माध्यमांशी संवाद साधत महायुतीवर टीका केली.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) देशभरात एनडीए आघाडीने (NDA Allianace) बहुमत प्राप्त करून सरकार स्थापन केले. काल (रविवार, ९ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशभरात बहुमत जरी प्राप्त झाले असले तरीही भाजपसह (BJP) महायुतीला (Mahayuti) मात्र महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. यावरून, शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (सोमवार, १० जून) माध्यमांशी संवाद साधत महायुतीवर टीका केली. तसेच आज होणाऱ्या शिवसेना उबाठाच्या बैठकीवर भाष्य केले.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन इथे बैठक सुरू आहे. २८८ जागावर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू याबाबत कोणी ही शंका घेऊ नये. महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिंकणार. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा होणार. इनडोअर बैठका पावसाळा पाहता आम्ही घेणार आहोत. महाविकास आघाडीने महाराष्ट्राला भाजप मुक्त केलं आहे.” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना भवन येथे बैठकीसाठी खासदार संजय राऊत , खासदार अरविंद सावंत ,आमदार नितीन देशमुख आणि आमदार सचिन अहिर यांच्यासह इतर नेते दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याअगोदर संजय राऊत यांनी शिवसेना शिंदेगटावर टीका करत म्हंटले, “काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचे सरकार नाही. आतापर्यंत मोदींचे सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरेंटी मोदी है तो मुनकीन है सब कुछ मात्र काल ते चित्र नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेला आहे. दोन टिकू महत्त्वाचे आहेत. दोन बाबू नितेश, बाबू चंद्राबाबू या टेकून चा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राच म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाटेला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले. शेअर बाजार वाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत. अजित पवार यांच्या वाटेला भोपळा आहे. आणि दुसरे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकलेला आहे. अर्थात आयुष्यभर कोणी गुलामी करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवण्याचा ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तूडून घ्यायला तयार असतील.”

हे ही वाचा:

NEET Exam घोटाळा: फेरपरीक्षा घेण्यावरून पालक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

NARENDRA MODI OATH TAKING CEREMONY : मोदींच्या पाठोपाठ घेतली ‘यांनी’ शपथ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss