spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Balasaheb Thackeray यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार?: Sanjay Raut

शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (शनिवार, २० जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. काल (शुक्रवार, १९ जुलै) सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे (Waghnakh)आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटावर हल्ला करत नकली म्हणून उल्लेख केला होता. यावर संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी, “ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली, ज्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार?” असा सवाल उपस्थित केला.

संजय राऊत यावेळी म्हणाले, “जे कोणी बोलत आहेत ते बेईमान लोकं आहेत. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची औलाद हे आम्हाला नकली बोलणार. ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली, ज्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार. मुळात वाघ नखं ऐतिहासिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघ नखं वापरली असतील तर आम्ही त्या वाघनखांना प्रणाम करतो. इतिहासतज्ञ सांगत आहेत आणि लंडनचे म्युझियम सांगतय की खात्री नाही की ती वाघ नखं तीच आहेत का ? तुम्ही जसं एकेकाळी भाजप मतांसाठी गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं, कुठलेही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे त्या पद्धतीने या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात महाराष्ट्रात जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवला आहे “

ते पुढे म्हणाले, “वाघनखं ही काय मत मागण्याची वस्तू आहे का, राजकारण करण्याची वस्तू आहे का, ती ऐतिहासिक आणि श्रद्धेची जागा आहे. तुम्ही लोकांना फसवत आहे, ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसांचा इतिहासाशी काय संबंध, शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी हे मतांपुरतं बोलायला ठीक आहे पण त्यांचा संबंध काय हे मला त्यांनी सांगावे.”

पुढे भाजपवर टीका करत ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचा (BJP) कोणत्यातरी इतिहासाशी संबंध आलाय का? भाजपचा संबंध ना कधी स्वातंत्र्यसंग्रामाशी आला, ना महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यासाठी आला, ना आणीबाणीच्या संघर्षाशी आला. वाघनखांचा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) अपमान करत आहेत, हे लोकं इतिहासाचा अपमान करत आहेत. हे स्वतः डुप्लिकेट आहेत त्यांना स्वतःला डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे. छत्रपतींच्या वाघ नखांशी आम्हाला अत्यंत आदर आणि श्रद्धा आहे, पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघ नखं, वाघ नखं करत आहात आधी स्वतःची नखं कापा नीट मग वाघ नखांवर बोला,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा:

HEAVY RAINFALL : पुढील २४ तासात कोसळणार मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज

VIDHANSABHA ELECTION मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; SHARAD PAWAR यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss