आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठीच चित्रपट, Dharmaveer 2 वरून Sanjay Raut यांची CM Eknath Shinde यांच्यावर टीका

आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठीच चित्रपट, Dharmaveer 2 वरून Sanjay Raut यांची CM Eknath Shinde यांच्यावर टीका

बहुचर्चित धर्मवीर २ (Dharmaveer 2) या सिनेमाचा काल (शनिवार, २० जुलै) ट्रेलर लाँच (Dharmaveer 2 Trailer Launch) सोहळा मुंबईतील वरळी येथे पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EknatH Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे सलमान खान हे उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धर्मवीर २ चा ट्रेलर लॉन्च झाला असून मुख्यमंत्री शिंदे यांनी “दिघे साहेबांचं आयुष्य आणि कर्तुत्व एवढं मोठं होतं कि एका सिनेमामध्ये ते सांगणं शक्य नाही म्हणून आता दुसरा पार्ट टू केलाय,” असे वक्तव्य केले. आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत, “आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवला आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.

संजय राऊत यांनी आज (रविवार, २१ जुलै) संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी ते म्हणाले, “कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवतायेत. आनंद दिघे यांच हिंदुत्व हे बाळासाहेबांच हिंदुत्व होतं हे वेगळं हिंदुत्व नव्हतं. यांच हिंदुत्व वेगळ आहे. ठाण्यात टेंभी नाक्यावर हिंदुत्व वेगळ आणि आमचं वेगळं असं काही झालं नाही. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवतात. काश्मीर फाईल हा चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केला. असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. पहिला चित्रपटामध्ये आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवला आहे. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका आहेत. खोटं जे आहे ते खोट्याला उजाळा द्यायचा.. आपल्या बेईमानी वरती तारे चमकवायचे आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, “गुरु पौर्णिमेचे महत्व जे आहे ते आम्हाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजले. एक गुरु आयुष्यात असायला हवा. आम्हाला शहाणपण, स्वाभिमान, निष्ठा, ईमान याबाबत योग्य वेळी मार्गदर्शन केलं आणि नुसतं मार्गदर्शन नाही तर माणसांची घडवणूक जपणूक हे शिवसेनाप्रमुखांनी केली. म्हणून आमच्यासारखे लोक एका निष्ठेने दिसत आहेत. महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे ते गुरु होते. पण त्यातून काही नासके आंबे आहेत आणि ते बाहेर गेले. माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी बाळासाहेब गुरु म्हणून फोटो लावू नये. आम्ही आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो आणि आज आनंद दिघे साहेबांना… त्यांच्या कथा सांगणारे फिरत आहेत, सिनेमे काढत आहेत, नाटक काढत आहेत पण त्यांच्या काय भावना आहेत आम्हाला माहिती आहे. आम्ही जर सिनेमे काढले तर त्यांना तोंड झाकून फिरावे लागेल. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानत असतील त्यांच्या खोटं चित्र उभा करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचा अपमान आहे. बाळासाहेब यांचा देखील तो अपमान आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH: राजकारणी माणसावर पिक्चर लिहू शकता हे मी पहिल्यांदाच बघितलं…अशोक सराफ

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH : धर्मवीर ट्रेलर लॉन्चवेळी क्षितिज दाते म्हणाला, प्रवीण तरडे यांच्यावर सरस्वती प्रसन्न…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version