सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंध्यांचे काही चालले नाही, सिनेट निवडणुकीत एकतर्फी विजयानंतर Sanjay Raut यांचा CM Eknath Shinde यांच्यावर निशाणा

सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंध्यांचे काही चालले नाही, सिनेट निवडणुकीत एकतर्फी विजयानंतर Sanjay Raut यांचा CM Eknath Shinde यांच्यावर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा (Mumbai Univerity Sinate Election) निकाल काल (शुक्रवार, २७ सप्टेंबर) जाहीर जाहीर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा (Yuva Sena) वरचष्मा दिसून आला. १० पैकी १० जागांवर युवासेनेचे उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला. सकाळी ९ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात वैध आणि अवैध मतांची विभागणी करुन विजयी कोटा निश्चित करण्यात आला. मतमोजणीनंतर युवासेनेने सर्वच्या सर्व जागा काबीज केल्याचे स्पष्ट झाले. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर (Mahayuti Government) चांगलीच आगपाखड केली आहे.

संजय राऊत यांनी आज (शनिवार, २८ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत याविषयीभाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “आपण पाहिलं असेल मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका झाल्या. या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष, मिंधे गट यांनी गेली दोन वर्ष निवडणुका टाळण्याचा प्रयत्न केला. निवडणुका होऊच द्यायचा नाही, ९२ हजार मते आम्ही नोंदवली होती ती मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपद्याप त्यांनी केले. दोन वर्षात अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं, शेवटी हायकोर्टाने त्यांना दणका दिला. दहा पैकी दहा जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे काल चित्र स्पष्ट झाले. याआधी पदवीधर मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला आता सिनेट मध्ये म्हणजे पदवीधर मतदान करतात त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत, यापैकी ९ उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतले,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आमच्या शेवटच्या उमेदवाराने ८६५ मतं घेतली आणि एबीव्हीपी, भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांचे मिळून ७०६ मतं आहेत आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मते ८६५ आहेत. मुंबई विद्यापीठावर अशा प्रकारे भगवा फडकला आहे. मिंधे गटाने प्रयत्न करुन सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही याचे कारण असे आहे की हा जो मतदार आहे तो विकला जात नाही त्यामुळे मिंध्यांचे काही चालले नाही. हे मतदान ईव्हीएम वर होत नाही, बॅलेट पेपरवर होतं त्याच्यामुळे त्यांना काहीही गडबड करता आली नाही. मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केले. लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारे एक चित्र तुमच्यासमोर मांडले आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Dharmaveer 2 अत्यंत बोगस, बकवास आणि काल्पनिक सिनेमा: Sanjay Raut

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version