spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sharad Pawar यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही; Sanjay Raut यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत “शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात तीन – चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही,” असे वक्तव्य केले होते. त्यावरून आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (रविवार, ८ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत फडणवीसांवर चांगलीच आगपाखड केली आहे. ‘फडणवीसांच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का?’ असा सवाल विचारात, “पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. अश्यातच, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav THackeray) यांनी विनंती करूनही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत मोठे भाष्य करत, “मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा संख्याबळावर होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आता विचार करण्याचं काही कारण नाही,” असं म्हंटल होते. त्यावरून राजकीय वर्तुळात टीकाटिपण्यांना सुरुवात झाली आहे. यामुळेच संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

फडणवीसांच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का? संजय राऊतांचा सवाल

संजय राऊत यांनी यावेळी फडणवीसांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “फडणवीसांच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे ? हे त्यांना कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती. आज त्यांच्या आयुष्याची, राजकारणाची आणि प्रतिष्ठेची जी घसरण झालेली आहे. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही, २०१९ साली शरद पवारांच्या डोक्यात काय होतं हे त्यांना कळलं नाही.. पण झाले ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री! २०२४ ला हिम्मत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतंय हे तेव्हा समजेल… तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचं बंद होईल,” अश्या शब्दात त्यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा यासाठी ते तीन दिवस दिल्लीत जाऊन बसले. उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत असताना त्यांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली. पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही. उद्धव ठाकरेंच्या हाती दिल्लीत जाऊन काहीच लागले नाही. आता शरद पवारांनीदेखील म्हटलंय कि, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही. त्यावर नाना पाटोळे यांनीदेखील समर्थन दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या जे मनात होते ते आता शक्य होताना दिसत नाही. पण मला असे वाटते कि, शरद पवारांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात तीन-चार चेहरे असतील पण त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

तर Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत; BJP आमदार Parinay Fuke यांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss