spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis यांच्याकडे इतिहासाचा मास्टर पाठवु: Sanjay Raut

मालवण येथील राजकोट (Rajkot) या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काल (रविवार, १ सप्टेंबर) रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडले. यावरून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करत विरोधकांवर आरोपांची तोफ डागली आहे. दरम्यान त्यांनी ‘शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हा खोटा इतिहास काँग्रेसने सांगितला’ असे वक्तव्य यावेळी केले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून फडणवीसांवर जोरदार हल्लबोल चढवला आहे. आज (सोमवार, २ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत त्यांनी, “देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास काळजीपूर्वक वाचावा. नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्टर पाठवु,” असा टोला दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

फडणवीसांवर टीका करत संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा नवीन चिंतनाचा विषय समोर आणला आहे. तुम्हाला इतिहास काय माहिती? तुम्ही कधी इतिहास शिकला? म्हणजे तुम्ही शत्रू आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली. शिवाजी महाराजांनी सुरत राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली. ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते प्रोटेक्शन मनी देत होते. हा राष्ट्रद्रोह आहे. त्यामुळेच त्यांनी ठरवलं ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल. आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा. नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्टर पाठऊ,” असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मालवण मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला हे तुमचे पाप आहे. तुम्हीच तोडला , त्यात कोट्यावधीच्या घोटाळा करणारे आज ही मोकाट आहेत तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. कारण ते तुमचे पेशवाईचे शीलेदार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटलांसोबत अन्य लोक होते. त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासुन रोखण्याचं काम हे भाजपचे गुंड करत होते. तुम्ही त्यांचे समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे तुमचे गुंड. आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहात का? तुम्हाला शिवाजी महाराजांच नाव घेण्याचा अधिकार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. हे तुमच्या मनामध्ये आहे की नाही? आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून जो पर्यंत विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही ही घोषणा कोणाची होती? तुम्ही शिवाजी महाराजांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव कारवार प्रश्नावर तुमची काय भूमिका आहे हे स्पष्ट करा,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

महाविकास आघाडीच्या आंदोलनावर भाष्य करत फडणवीस म्हणाले होते कि, “आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं कि शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण महाराजांनी सुरत लुटली नव्हती. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता. किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होता. पण, सुरत कधी लुटली नव्हती. जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अश्या प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, मग आता त्यांना माफी मागायला सांगणार का?” असे ते म्हंटले होते.

हे ही वाचा:

नेहरूंपर्यंत का जाता? माफी तुम्ही, BJP ने मागायला हवी.. Devendra Fadnvis यांच्या वक्तव्यावर Ambadas Danve आक्रमक

महाराजांबद्दल शंका का निर्माण करता? एवढा राग का व कश्यासाठी? सुरत लुटीबद्दलच्या Devendra Fadnavis यांच्या वक्तव्यावर Jitendra Awhad आक्रमक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss