Saturday, July 6, 2024

Latest Posts

महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी करणाऱ्या Kangna Ranaut यांना Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

पहिले तीन दिवस मात्र नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील अनेक खासदार आणि मंत्री देखील शपथविधीचा कार्यक्रमात सहभागी होतील. अश्यात नव्यानेच निवडून आलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत (Kangna Ranaut) देखील या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथग्रहण करणार आहे. अश्यात ती दिल्लीत हाजीर झाली आहे. परंतु राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी केल्याने कंगनाला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

आज लोकसभा अधिवेशनाचा (Loksabha Session) दुसरा दिवस आहे. काल २४ जूनपासून लोकसभा अधिवेशणास सुरवात झाली आहे. संसद भवन येथे हे अधिवेशन पार पडत आहे. पहिले तीन दिवस मात्र नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील अनेक खासदार आणि मंत्री देखील शपथविधीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. अश्यात नव्यानेच निवडून आलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) देखील या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथग्रहण करणार आहे. अश्यात ती दिल्लीत हाजीर झाली आहे. परंतु राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी केल्याने कंगनाला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. यात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील कंगना रनौत यांच्यावर टीका केली आहे. कंगना रनौत हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधून निवडून आली असल्याने तिची राहण्याची सोय हिमाचल भवन मध्ये करण्यात यावी.’ अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे.

सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी कंगना रनौत बद्दल बोलताना ते म्हणाले, ‘खरं म्हणजे त्या इतक्या मोठ्या आहेत त्यांना राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं. एक नियम आहे नवीन खासदार जेव्हा निवडून जातात, दिल्लीत (Delhi) आम्हीही गेलो तेव्हा ते ज्या राज्यातून निवडून जातात त्या राज्याच्या दिल्लीतल्या त्या वास्तू आहेत सदन आहेत. बिहार सदन असेल, उत्तर प्रदेश भवन असेल हरियाणा असेल महाराष्ट्र सदन असेल गुजरात भवन असेल त्यामध्ये त्या खासदाराचे व्यवस्था त्याला कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत केली जाते. आजही आपल्या राज्याचे खासदार जे निवडून गेले आहेत मी कालच चौकशी केली. ते महाराष्ट्र सदनमध्ये आहेत आणि त्यांना एक सिंगल रूम मिळाली आहे राहण्यासाठी ते आपलीव्यवस्था करतात. आता या कंगना रनौत नावाच्या ज्या श्रीमती आहेत त्यांनी महाराष्ट्र सदन मुख्यमंत्र्यांचा सूट मागावा हा फार मोठा विनोद आहे. त्या हिमाचल प्रदेश मधून निवडून आल्या आहेत. त्यांची व्यवस्था हिमाचल सदनमध्ये कायद्याने व्हायला हवी. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल की त्यांना मुख्यमंत्र्यांचा सूटवर ठेवावं. आमची त्याला काही हरकत नाही. मग आमच्या महाराष्ट्रातले अनेक सीनियर खासदार आहेत, वरिष्ठ खासदार आहेत ,जॉईंट किलर आहेत मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांचा सूट. अशा मागण्या करणं हा मूर्खपणा आहे. असू द्या त्या कंगना रनौत आहेत.’

याचबरोबर संजय राऊत यांनी ट्विट देखील केले आहे ज्यात त्यांनी कंगना रनौत यांचा श्रीमतीजी म्हणून उल्लेख केला आहे. ट्विट मध्ये त्यांनी,’बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडूनआल्याआहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळतअसेलतर काहीच हरकत नाही.महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहातआहेत श्रीमतीजी…’ असं म्हणलं आहे.

हे ही वाचा

Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

Sonakshi Sinha ने नेसली ४४ वर्षा पूर्वीची साडी ? जुन्या साडीची रहस्य काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss