Tuesday, October 1, 2024

Latest Posts

सध्याचे सरकार बैलपुत्र, त्यांचा बाप बैल आहे; Sanjay Raut यांचे वादग्रस्त विधान

“सध्याचे सरकार बैलपुत्र आहेत. त्यांचा बाप बैल आहे. त्यामुळे त्यांची बुद्धिही बैलाची आहे. आम्ही गौमातेला मानतो, पण गौमातेच्या कत्तली ज्या भाजपशासित राज्यात होत आहेत त्यावर बोला,” अश्या शब्दांत शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरादार आगपाखड केली आहे. यावरून आता मोठा वादंग निर्माण झाला असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील महायुती सरकारसुद्धा (Mahayuti Government) सध्या ऍक्शन मोडमध्ये असून राज्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेणे जात आहेत. अश्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली काल (सोमवार, ३० सप्टेंबर) मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे ३८ निर्णय घेण्यात आले. यात महत्वाचा निर्णय म्हणजे देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आज (मंगळवार, १ ऑकटोबर) माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हणाले, “सध्याचे सरकार जे आहे ते बैल पुत्र आहेत. त्यांचा बाप बैल आहे. या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दुसरं काही काम नाही, आम्ही गौमातेला मानतो आम्हाला सांगायची काही गरज नाही. पण गौ मातेच्या कत्तली ज्या भाजपशासित राज्यात होत आहेत त्यावर जरा सांगा. गाईला राज्यमाता करून तुम्ही गाईचं रक्षण कस करणार? खरं तर गाईच्या दुधाला भावा द्या, शेतकऱ्यांचा दुधाच्या भावासाठी जो संघर्ष चाललाय त्यावर चर्चा करा, त्यावर बोला, पण ज्यांचा बापचं बैल आहे आणि ज्यांची बुद्धीच बैलाची आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? निवडणुकीसाठी असे फंडे करत असतात,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “दिल्लीतून काही बैल येत असतात. काही केंद्रातून फिरत असतात. महाराष्ट्राचा त्यांनी बैल बाजार केलेला आहे. गाईची पूजा आम्ही सर्व करतो त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नाही. तुम्ही सावरकरांना मानता ना, तुमचे जे कोणी हिंदुत्वाचे गब्बर आहेत त्यांनी सावरकरांचं गाईविषयी जे म्हणणं आहे ते एक हिंदू म्हणून ते आधी समजून घ्या. जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही, वीर सावरकर यांनी गौमातेविषयी जे मत जी भूमिका स्पष्ट केलीये ती जे मान्य असती तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं. सावरकर जर आता असते तर त्यांनी यांच्या कानाखाली लगावली असती,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss