PM Narendra Modi युक्रेनमध्ये जातात पण पेटलेल्या मणिपूरला भेट देत नाहीत: Sanjay Raut

PM Narendra Modi युक्रेनमध्ये जातात पण पेटलेल्या मणिपूरला भेट देत नाहीत: Sanjay Raut

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (बुधवार, ११ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अशांत होत असलेल्या मणिपूरवरून (Manipur) भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आगपाखड केली. देशात घुसखोरी करत असलेल्या चीनच्या मुद्द्यवरूनदेखील भाष्य करत त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीनच्या घुसखोरीवर बोलूच शकत नाही, असे म्हंटले आहे. पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये गुंतलेत तर अमित शाह विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई दौरे करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी बोलताना समाज राऊत म्हणाले, “मणिपूर हा या हिंदुस्तानचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या अडीच वर्षापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्वतःला विश्वगुरू, नॉन बायोलॉजिकल ईश्वराचे अवतार मानतात. जे रशिया आणि युक्रेन मधील युद्ध मिटवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध भूमीवर जातात, आणि अंधभक्त मोदी प्रत्यक्ष युद्धभूमीवर म्हणून चार तास रशिया युक्रेन वर हल्ला करणार नाही असे ढोल वाजवतात, मोदी पूतीन बरोबर घरात बसून चहा पितात मग झेलेन्सकीला भेटतात, युद्ध बंदीवर चर्चा करतात. असे ते फार मोठे एक निधड्या छातीचे नेते आपल्या देशाला लाभलेले आहेत. या महानेत्याला आमच्या देशातल्या मणिपूर मधील हिंसाचार थांबवता येत नाही? ते अपयश त्यांनी स्वीकारले पाहिजे. प्रधानमंत्री अद्याप मणिपूरला गेले नाहीत एअर इंडिया वन घेऊन ते जगभरात फिरत आहेत पण या देशाचा एक भाग मणिपूर पेटले आहे तर तिकडे ते जात नाहीत,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानमोडींवर टीका केली.

ते पुढे म्हणाले, “गृहमंत्री अमित शहा मुंबईत येत आहेत, राजकीय बैठका घेतात निवडणुकांची तयारी करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत पण मणिपूर वर कधी बोलणार? तुम्हाला मणिपूर आपल्या हातातून घालवायचे आहे का? आता पंडित नेहरू नाही आहेत त्यांना दोष द्यायला. मणिपूरची अवस्था ज्या काळात कश्मीर पेटलं होतं त्याच्यापेक्षा भयंकर आहे. मोदी आणि अमित शहा यासंदर्भात एक अक्षर बोलायला तयार नाहीत याचा अर्थ या देशातल्या जनतेने काय घ्यायचा? एखाद्या हिरोसारखी ॲक्शन दाखवण्यापेक्षा मणिपूरला जा जरा नाहीतर राजीनामा द्या,” असे ते म्हणाले.

“चीन सर्वत्र घुसले आहे, जे नरेंद्र मोदी मणिपूर बद्दल बोलत नाहीत ते चीन वर काया बोलणार? हे घाबरलेली लोकं आहेत, हे फक्त पाकिस्तानला डोळे दाखवू शकतात तो कमजोर देश आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

नागपूर अपघातप्रकरणावरून मविआ नेत्यांमध्येच जुंपली; ठाकरे गटाच्या Sushma Andhare आणि काँग्रेसचे Vikas Thakre यांच्यात नवा वाद

जर Mahavikas Aghadi चे सरकार आलं तर सगळ्या योजना बंद पडतील: Chandrashekhar Bawankule

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version