Mohan Bhagwat यांनी मन व्यक्त केलं, त्यावर देशाने चिंतन करावं: Sanjay Raut

Mohan Bhagwat यांनी मन व्यक्त केलं, त्यावर देशाने चिंतन करावं: Sanjay Raut

शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज (शुक्रवार, १९ जुलै) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नाव न घेता टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काल एक विधान केलं होत. “माणसाला सुपरमॅन व्हायचं असतं, मग त्यांना देवता व्हायचं असतं” असे ते म्हणाले होते. त्यांचा रोख नक्की कोणाकडे होता यावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत. अश्यातच संजय राऊत यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देत, “मोहन भागवत यांनी मन व्यक्त केल आहे. त्याच्यावर देशाने चिंतन केल पाहिजे,” असे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यावेळी म्हणाले, “एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते. एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो. ते नसते तर अयोध्येत राम भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते. या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिक पद्धतीने अजैविक पद्धतीने जन्माला आलो म्हणजे मला वरून देवाने जन्माला घातलं अशा प्रकारे लोकांना भयमित करत आहे.”

ते पुढे म्हणाले, “एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेंचा युद्ध मीच थांबवला. पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार थांबू शकत नाही. मला असं वाटतं त्याच व्यक्ती विषयी मोहन भागवत बोलले आहेत. काही व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजतात. पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची या सामान्य माणसाने खेचून घेतली. तो कॉमन मॅन आज सुपरमॅन आहे असा आम्ही मानतो. तरी मोहन भागवत यांनी मन व्यक्त केल आहे. त्याच्यावर चिंतन देशाने केल पाहिजे. भारतीय जनता पक्षाने हे केलं पाहिजे.”

काय म्हणाले होते मोहन भागवत?

आरआरएस प्रमुख मोहन भागवत यांनी काल (गुरुवार, १८ जुलै) झारखंड येथे एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला होता यावेळी ते म्हणाले कि, “स्वतःचा विकास केल्यानंतर माणसाला अलौकीक बनायचे असते. सुपरमॅन व्हायचे असते. पण तो एवढ्यावरच थांबत नाही, यानंतर त्याला वाटते कि आपण देवता व्हावे. परंतु, देवता म्हणतात कि आपल्यापेक्षा मोठा देव आहे आणि म्ह त्याला देव बनायचे असते. देव म्हणतो कि तो वैश्विक रूप आहे. म्हणून त्यालाही वैश्विक रूप बनायचे आहे. त्यानंतरही थांबायला जागा आहे कि नाही हे कोणालाच माहीत नाही. पण विकासाला अंत नाही,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

Mahavikas Aghadi एकत्र Maharashtra Assembly Election लढणार आणि महाभ्रष्ट Mahayuti सरकार उखडून फेकणार: K.C. Venugopal

Pooja Khedkar प्रकरणात UPSCची मोठी कारवाई, दाखल केला फौजदारी खटला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version