संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा, देशात एकच VIP…

आज मुंबई मध्ये माध्यमांशी बोलत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा, देशात एकच VIP…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच आज मुंबई मध्ये माध्यमांशी बोलत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, राम मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या देशात एकच व्हीआयपी आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. हे भगवान विष्णूचे १३ वे अवतार प्रभू श्रीरामाला मोदी बोट धरून मंदिरात नेत आहेत असे पोस्टर भाजपाने लावले आहेत. ज्यांनी पोस्टर लावले त्यांनी आधी यावर बोलावे कोण व्हीआयपी व कोण सामान्य आहेत. आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे गेले होते. राम मंदिर पाडले तेव्हा ही लोकं कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली होती. अशोक सिंघल यांना विचारा, तेव्हा मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या ? २०२४ नंतर कुणाचे हिंदुत्व आहे ते दिसेल. बाबरी पाडल्याचे खापर भारतीय जनता पक्षाने घाबरून शिवसेनेवर हे खापर फोडले आहे. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याची गरज नाही तुमच्या आधीपासून आम्ही अयोद्धेत आहोत.आम्ही सर्व जण अयोध्येत जाऊ असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तर पुढे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. तुमची छाती आगोदर मोजा. बाबरीचे घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचे काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करत आहे. सत्तेमुळे छाताडं आता फुगली असतील तेव्हा तुमची छाताडं कुठे गेली होती? तेव्हा कुठे होती छाताडं? आम्हाला शिकवू नका सत्तेचा माज दाखवू नका. रामभक्ती आणि हिंदुत्व आम्हाला शिकवू नका असं राऊत म्हणाले आहेत. तर नरेंद्र मोदी अंडी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्लबोल हा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ही सध्या डॉक्टर झाले आहेत. मग फडणवीस,उद्या अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टरेट होतील. मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल. देवेंद्र फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती आहे. आम्हाला ही डॉक्टरकी नको, आम्ही त्या लायक नाहीत.

Exit mobile version