Tuesday, July 2, 2024

Latest Posts

संजय राऊतांकडून राहुल गांधींची पाठराखण करत साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा, म्हणाले…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर आरोप केले.

Sanjay Raut Comment on Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर आरोप केले. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि २४ तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत, असे वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्या भाजपवरील या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून त्यांना उत्तरं दिले तर अमित शहा देखील भडकल्याचे चित्र दिसत होते. आता यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत कि, “नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सर्वांना काल राहुल गांधी भारी पडले. त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे सरंक्षण मागावं लागलं. कालचं चित्र फार विचलित करणार होतं. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेत ओम बिर्लांकडे सरंक्षण मागावे लागले. कालपर्यंत यांची इतकी हुकूमशाही आणि दादागिरी होती, तेव्हा आम्हाला यांच्यापासून सरंक्षण मागावं लागत होतं. पण राहुल गांधींनी काल संसदेत त्यांना गुडघ्यावर आणलं. त्यांना ओम बिर्लांकडे सरंक्षण मागावं लागलं. हे चित्र देशाने पाहिले. मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो, हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं. ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या”, असेही संजय राऊतांनी सांगितले.

“नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सर्वांना काल राहुल गांधी भारी पडले. मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो, हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं. ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या”, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. “प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हिंदुत्वाचे सर्वात मोठे गुरु शंकराचार्य यांना आमंत्रित केले गेलं नाही. त्यांनी हिंदुत्वावर गप्पा माराव्यात. काल राहुल गांधींचे भाषण हे देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होतं. राहुल गांधी यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला. राहुल गांधी यांनी काल काय चुकीचं सांगितलं. आम्ही हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असा आरोप भाजप नेहमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी करतं. तेव्हा उद्धव ठाकरे जे उत्तर देतात, तेच उत्तर राहुल गांधींनी दिलं”, असेही संजय राऊत म्हणाले.

 

Latest Posts

Don't Miss