Wednesday, September 25, 2024

Latest Posts

उठावमधला ‘उठा’ म्हणजे उद्धव ठाकरे; बंड नाहीतर उठाव म्हणणाऱ्या आमदारांना संजय राऊतांचा टोला

मुंबई – शिवसेना आणि शिंदे गटातील सत्ता संघर्षाचा वाद नवीन सरकार स्थापन झाले तरीही सुरूच आहे. दरम्यान शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पक्षातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यात सध्या व्यस्त आहेत. तर दुसरीकडे सेनेतील गळती अजूनही सुरूच आहे. एकामागून एक आमदार आणि खासदार पक्षातून बाजूला होत शिंदे गटात सामील होणं अजूनही सुरूच आहे. याच बंडखोर आमदारांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

हेही वाचा

तुम्ही पण चहासोबत बिस्किटे खाता का? ही सवय खूप धोकादायक असू शकते.

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ‘हे बंड नसून उठाव आहे’ असं वारंवार सांगणाऱ्या बंडखोरांवर टीका करताना उठावमधील उठा हा उद्धव ठाकरे आहेत, असा टोला लगावलाय. त्याचबरोबर राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात नसल्याची टीकाही यावेळी केली. आमचं बंड नाही उठाव आहे, असं सांगणाऱ्यांना काय म्हणाल असं पत्रकाराने प्रश्न विचारलं. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, ”तिरडी उठते. राजकीय म्हणतोय. नाहीतर परत म्हणतील आमचे मुडदे आले वगैरे वगैरे. तर नाही तुम्हाला या राज्याची जनता उठवणारच आहे,” असं म्हणत बंडखोरांवर टीका केली.

हेही वाचा

मगरीने केली शिकार, या एका क्षणात…

 

पुढे संजय राऊत जे म्हणाले त्यावर अनेकांना प्रश्न पडला आहे. संजय राऊत म्हणाले, बंडखोर हा उठाव आहे असं म्हणत असतील तर त्या उठावमधील उठा हा उद्धव ठाकरे आहेत. “काय उठाव? उठावमधला ‘उठा’ हा ‘उद्धव ठाकरे’ आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा राऊत यांनी बंडखोरांना दिला. या आधीही संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे गटाला लोकं तुमची गाढवावरून धिंड काढतील अशा शब्दात कडक इशारा दिला

Latest Posts

Don't Miss