Sanjay Raut : सर्वात मोठी बातमी ! संजय राऊतांचा राहुल गांधींना थेट इशारा; … तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला आणि यावेळी राहुल गांधींना इशाराच दिला आहे. या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut : सर्वात मोठी बातमी ! संजय राऊतांचा राहुल गांधींना थेट इशारा; … तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला आणि यावेळी राहुल गांधींना इशाराच दिला आहे. या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले. वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांवर बोलण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो, असा इशारा देतानाच सावरकर हे आमचं श्रद्धाचं स्थान आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच देशातील वातावरण हुकूमशाहीकडं जाणारं, गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं आहे. महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार वाढत आहेत. या मुद्यावर भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्याला चांगल समर्थन मिळत आहे. अशात सावरकरांचा विषय काढण्याची काही करज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले.

सावरकरांचा विषय काढल्याने शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला. राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्था बिकट झाली आहे. महाराष्ट्र आणि देशातील लोकांना सावरकरांबद्दल आदर. इतिहासात काय घडलं आणि काय नाही हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा. त्या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.

इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडं लक्ष द्याव असं राऊत यावेळी म्हणाले. वीर सावरकारांना भाररत्न द्यावा अशी आमची मागणी आहे. सातत्यानं आम्ही ही मागणी करत आहोत. मला कळत नाही भाजपमध्ये जे नवीन सावरकर भक्त निर्माण झाले आहेत, ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून का धरत नाहीत? असा सवाल राऊतांनी यावेळी केला.

सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमची मागणी आहे. भाजपमधील आणि इतर नवीन सावरकर भक्त आमची मागणी का उचलून धरत नाही? नकली हिंदुत्ववाद्यांना सवाल आहे. तुम्ही सावरकरांना भारतरत्न द्या. केवळ नकली आणि ढोंगी प्रेम दाखवू नका, असा टोला त्यांनी लगावला. सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते. सावरकर हे त्यांचे आदर्श पुरुष कधीच नव्हते. आता राजकारणासाठी त्यांनी सावरकरांचा विषय घेतला आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. तो आजचा नाही, असंही ते म्हणाले.

वीर सावरकारांच्या मुद्दयावर काल उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं आहे. सावरकरांची बदनामी, त्यांच्याविषयीचं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा :

जळगावात धक्कादायक प्रकार! भाषण सुरु असतानाच एकनाथ खडसेंच्या हातातून खेचला माईक

सावरकरांवर टीका, राजकारण तापलं; भर थंडीत हजारो मनसैनिक शेगावच्या दिशेने, मुद्दा काय?

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version