Sanjay Raut : साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु…संजय राऊतांचा हल्लाबोल

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Disputes) निर्माण होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. कोणाला मुंबई तोडायचीय, कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायचीत.

Sanjay Raut : साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु…संजय राऊतांचा हल्लाबोल

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Disputes) निर्माण होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. कोणाला मुंबई तोडायचीय, कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायचीत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले. जर लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही, तर या राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, हे सगळं सुरु असताना मुख्यमंत्री ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तुकडून आल्यावरआसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करु नये म्हणजे झालं असा टोलाही राऊतांनी शिंदे सरकारला लगावला. हे सरकार राज्यात आल्यामुळं अनेक राजकीय दरोडेखोरांना असं वाटत आहे की आपण महाराष्ट्राचे लचके तोडू असेही राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यपाल चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजपचे प्रवक्ते देखील चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत. उपमुख्यमंत्री त्याचे समर्थन करत असल्याचे राऊत म्हणाले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे. त्यामुळं हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत म्हणाले. सध्या महाराष्ट्रात कमजोर आणि हतबल सरकार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे हे युवा नेते आहे आणि त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रीय दौराला महत्त्व दिला पाहिजे, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्य काम करत आहे. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते तेजस्व यादव यांची भेट घेणार आहेत. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बदल केला आहे. महाराष्ट्र मध्ये ही आम्ही आधी वर्षांपूर्वी हे बदल केला होता. हा बदल साठी आदित्य ठाकरे यांच्या जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि त्यांना यश मिळत आहे. देशाच्या अनेक प्रमुख युवा नेते यांना आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि ते संवाद देखील सुरू आहे. आज तेजस्वी आहे, पश्चिम बंगाल शहीद अनेक राज्यांमध्ये अनेक युवा नेते आहे आदित्य ठाकरे त्यांना यांच्याशी संवाद साधायच्या आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे बिहारचा दौरा म्हणून बघू नका. ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहे. या दौऱ्याकडं राष्ट्रीय दौरा म्हणून बघा, त्याला राष्ट्रीय दौरा म्हणून महत्व दिलं पाहिजे असेही राऊत यावेळी म्हणाले. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मदतीनं परिवर्तन घडवून आणले अडीच वर्षापूव्ही आम्ही देखील परिवर्तन केलं होते. आता पुन्हा महाराष्ट्रातच परिवर्तन करण्याची तयारी सुरु झाल्याचा सुचक इशारा राऊतांनी दिला आहे.

रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे की दोन महिन्यानंतर काय होणार ते सांगता येणार नाही याचा अर्थ त्यांनाही आमच्या हालचालीची उत्तम बातमी ची खबर लागली आहे. हे सरकार पुढच्या दोन महिन्यात राहील की जाईल यामध्ये अद्यापही संभ्रम आहे. केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्या कारणात काही गोष्टी केल्या असेल ते चांगलं आहे. असं मला पोलिसांकडून आणि इंटेलिजन्स ब्युरो करून काढलेला आहे. खरं म्हणजे गेल्या २५ वर्षापासून आमच्याकडे सुरक्षा व्यवस्था होती. पण या सरकारने सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. परंतु आम्ही हे सुरक्षा व्यवस्था परत मागणार नाही. जिथे मी बसलो आहे सामना किंवा शिवसेना ऑफिस. सगळ्या माहीत असूनही माझ्या सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आणि माझ्या जीवाशी खेळाच्या प्रयत्न सरकार करत आहे. पण काहीही झाला तर मी सुरक्षा मागणार नाही अशी कोणती कमिटी आहे की ज्याने एका क्षणात सगळ्यांच्या सुरक्षा काढला आणि ताबडतोब सत्यामध्ये असलेल्या त्यांनाही सुरक्षा देऊन टाकली. सर आमच्या काही बरं वाईट झाला तर हे सरकार जिम्मेदार आहे असं स्पष्ट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या महिला नेता आणि अनेक नेते ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी दिशा सालियन यांच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची माफी मागावी ताबडतो . जर सीबीआय च्या केंद्रीय एजन्सी चा रिपोर्ट आला आहे तर तुम्ही कशाला एका युवा नेते ला बदनाम करत आहे असं देखील संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

Happy Birthday Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी आज खास दिवस

Maharashtra Politics: ठाकरे-शिंदे गटाची लढाई निर्णायक टप्प्यावर

Maharashtra Karnataka Border Disputes : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार!

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version