आनंद दवेंच्या जीवाला धोका असल्याचे संजय राऊत यांचे ट्विट

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उदयपूर येथील कन्हयाय्यालाल आणि अमरावती मधील उमेश कोल्हे यांच्या हत्येचा भयंकर प्रकार समोर आला.

आनंद दवेंच्या जीवाला धोका असल्याचे संजय राऊत यांचे ट्विट

आनंद दवेंच्या जीवाला धोका असल्याचे संजय राऊत यांचे ट्विट

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले होते. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उदयपूर येथील कन्हयाय्यालाल आणि अमरावती मधील उमेश कोल्हे यांच्या हत्येचा भयंकर प्रकार समोर आला. त्यामुळे देशात सर्व ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवाला धोका असल्याने पुणे पोलीसांनी योग्य ती सुरक्षा त्यांना द्यावी ट्विट खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले, “ब्राम्हण महासंघाचे नेते कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे.. उदयपूर प्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसानी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”. आनंद दवे यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे पोलिसांना केले आहे. राऊत यांनी दवेंच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलीसांना याबाबत खबरदारी घेण्यास सांगितले.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे चुकीचे आरोप केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिवडी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले असून १८ जुलै रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version