Sanjay Raut सरकार बदलणार सर्वांचा हिशोब पूर्ण होणार, मविआच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने संजय राऊत संतापले

Sanjay Raut सरकार बदलणार सर्वांचा हिशोब पूर्ण होणार, मविआच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने संजय राऊत संतापले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या राज्यातील शिंदे (Eknath shinde) फडणवीस (Devendra Fadnvis) सरकार विरोधात आज बंद (Mumbai Worli Bandh) करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत करणार आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबरला आंदोलन केलं जाणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी टीका केली आहे.

हेही वाचा : 

Mumbai Fire News मुंबई लोअर परळ भागातील अविग्नॉन पार्क इमारतीच्या ३५व्या मजल्याला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

संजय राऊत म्हणाले, लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही असेही राऊत म्हणाले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या दैवतांचा अपमान करतात. सरकार त्याचं समर्थन करते. मग याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

“कर्नाटकचे आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरी(Maharashtra Karnataka Borderism) सीमाभागात तणाव आहे. आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही. पण तोही मुद्दा लोकासोर येणं गरजेचं आहे. अशा अनेक मुद्द्यावंर आम्ही मोर्चा काढू. आम्ही महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू. हा जनतेचा मोर्चा असून, जनता या मोर्चात उतरेल. आम्ही फक्त या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत. आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटले.

Indian Air Force exercise भारत-चीन संघर्षादरम्यान आजपासून लढाऊ विमानांची LAC वर गर्जना, हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरु

पुढे राऊत म्हणाले, तो सीमाभाग जोपर्यंत केंद्रशासित होत नाही, तोपर्यंत अत्याचार होतच राहतील. तरीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी यात लक्ष घातलं असेल तर आम्हाला आनंद आहे. त्यांनी तत्काळ मराठी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि त्यांचा छळ थांबला पाहिजे. मराठी बोर्ड हटवणं, मराठी भाषेला शासकीय दरबारात विरोध करणं, मराठी फलकांवर कारवाई करणं, हे खेळ थांबले तरी त्या भागात शांतता नांदू शकते, असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai Worli Bandh महापुरुषांबाबत अवमानास्पद विधानानंतर, पुण्यापाठोपाठ मुंबईतील वरळी परिसरातही आज बंदची हाक

Exit mobile version