Sanjay Raut : तुरुंगातून बाहेर येताच राऊत घेणार राजकारणातील ‘किंगमेकर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नेत्याची भेट

Sanjay Raut : तुरुंगातून बाहेर येताच राऊत घेणार राजकारणातील ‘किंगमेकर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नेत्याची भेट

शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जामीन देण्यात आला आहे. संजय राऊत आर्थर रोड जेलच्या बाहेर आल्यानंतर शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिले सिद्धीविनायक मंदिरात गेले, यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर संजय राऊत त्यांच्या घरी परतले. घरी येताच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. १०३ दिवस आतमध्ये होतो, आता १०३ आमदार निवडून येतील, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर राजकारणातही पुढील समीकरण जुळवणायसाठी संजय राऊत मातोश्रीवर आणि सिल्व्हर ओक वरती ते जाणार आहेत.

हेही वाचा : 

अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त

आज सकाळी साडे अकरा वाजता संजय राऊत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राऊत सिल्व्हर ओक वरती जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज या भेटीमद्धे काय चर्चा होणार याकडे राज्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. दरम्यान संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर ते मातोश्रीवर जाऊन भेट घेणार होते परंतु कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी यामुळे काल भेट रद्द झाली. दरम्यान आज ते आज ११.३० वाजता राऊत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. जवळपास १०२ दिवस संजय राऊत तुरुंगात होते. शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे जेलमधून बाहेर आल्यामुळे शिवसेनेत प्राण आल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. मातोश्रीचा परिसरदेखील संजय राऊत यांच्या स्वागताच्या बॅनर्सनी फुललाय. भांडुप येथील एका ब्रिजवर डिजिटल फ्लेक्सवरदेखील संजय राऊतांच्या स्वागत अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्यात येतेय. तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात शिवसैनिकांनी रात्रीतूनच फटाके आणि आतिषबाजी करत संजय राऊतांचं स्वागत केलं.

Sanjay Raut : ‘फोनवर बोलताना उद्धव ठाकरेंच उर भरुन आला, मलाही भरुन आलं’, संजय राऊत भावुक

मला अटक करून त्यांनी किती मोठी चूक केली : राऊत

‘शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला, पण ती तुटली नाही. मला अटक करून त्यांनी किती मोठी चूक केली त्यांना कळेल. देशातल्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक संजय राऊतला अटक करणं आहे. मला कितीही वेळा अटक करा, शिवसेनेला त्यागणार नाही, भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो, या भगव्यासोबतच जाईन,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान मोदी राज्यातील युवकांचा रोजगार हिरावून घेत आहेत ; राहुल गांधींचा हल्ला

Exit mobile version