spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात!, असा थेट निशाणा संजय राऊत यांनी साधला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात!, असा थेट निशाणा संजय राऊत यांनी साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या सभेतून महाविकास आघाडीवर आणि विशेषत: ठाकरे गटावर निशाणा साधला होता. आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी हा हल्लबोल केला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, पंजाबराव देशमुख यांच्यानंतर देशाला लाभलेले उत्तम कृषिमंत्री म्हणजे शरद पवार आहेत. कृषिमंत्री म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना जेवढी मदत केली आहे. तेवढी मदत आता प्रधानमंत्री असताना मोदींनी केली नाही. तुम्ही काय केलं या महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या मोदींच्या काळात झाल्या आपण काळे कायदे आणले आहेत. हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं अपयश आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार होतात सिंगल ही झाल्या नाहीत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाहीत आणि महाराष्ट्रात येऊन आपण शरद पवारांवर बोलायचं. उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये जाऊन बोला योगी सरकारने नेमकं काय केलं आसाम मध्ये जाऊन बोला, तेथील मुख्यमंत्र्यांनी काय केलं. शातील शेतकरी संकटात आहे आणि याला जबाबदार नरेंद्र मोदी सरकार आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तसेच यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्लबोल हा केला आहे. शिवसेना शब्द त्यांनी घेऊ नये स्वयंघोषित शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भांडी घासतात भाजपची. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असू शकत नाही. थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला, स्वतःच्या पक्षाविषयी बोला पण रोज सकाळी उठल्यापासून ते सुरू करत आहेत मोदीं शहाच स्त्रोत्र त्यांनी सुरू केलं आहे. आपण शिर्डीला येता साईबाबांच्या दरबारात खोटं बोलता, गुमराह करता, भंपकपणा करता आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवता.

तर पुढे मराठा आरक्षण संदर्भात बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये एक तरुण नेता उपोषणाला बसला आहे. आपण शब्द देऊन देखील सरकारने तो पाळला नाही मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुम्ही जरांगे पाटलांना दिल्लीत घेऊन का आला नाही. पण यांच्या व्यासपीठावर एकजात भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आणि भ्रष्टाचारात बरबटलेले लोक बसले होते आणि हे भ्रष्टाचार नष्ट करायला निघालेत.

हे ही वाचा : 

धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss