spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांचा सरकारला टोला, नेहरु आणि इंदिरा गांधींच्या चरणाचे तीर्थ…

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या आज रविवार २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या आज रविवार २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केलं आहे. यावरून राजकीय घडामोडींना मात्र चांगलाच वेग हा आला आहे. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या, त्याच भीतीपोटी महाराष्ट्राच्या निवडणुका टाळत आहेत. त्यासाठी महापालिकांच्या निवडणुका घेत नाही. हे भेदरट, डरपोक आणि बुळचट सरकार आहे. ज्यांना निवडणुकांना सामोरे जायची भीती वाटते त्यांनी इंदिरा गांधीचा आदर्श ठेवला पाहिजे. आणीबाणीत इंदिरा गांधींनी निवडणुका घेतल्या. पराभव होणरा हे माहीत होतं तरीही त्यांनी निवडणुका टाळल्या नाही. त्यामुळे भाजप आणि मिंध्यांनी इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या चरणांचे तीर्थ प्राशन केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.

मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका सुरळीत पार पडतील. आम्ही सर्व जागा जिंकू. त्यांनी मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणुका टाळल्या आहेत. तीन वर्षापासून निवडणुका नाही. मुंबई, पुण्यात महापौर नसतील तर बरं नाही. राष्ट्रपतींनी पत्र लिहिलं. पुण्यातील खड्ड्यावरून राष्ट्रपती बेजार झाल्या. पुण्याच्या आयुक्तांना पत्र लिहिलं. राष्ट्रपतींचा ताफा खड्ड्यात अडकू नये अशी भीती वाटत होती. कारण पुण्यात ट्रकच्या ट्रक खड्ड्यात गेले, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे. सिनेटचा मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही. मतदार विकत घेतला जात नाही तिथे शिंदे, फडणवीस अजितदादा निवडणुका घ्यायला घाबरतात. ते डरपोक सरकार आहे. मुख्यमंत्री डरपोक आहेत. पैशाची ताकद ही निवडणुकीची ताकद नाही. सिनेटची निवडणूक हरतोय याची खात्री पटल्यावर निवडणूक रद्द केली. पण कोर्टाने चपराक लावली. अन् निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण विद्यापीठातील काही लोक कोर्टात जाऊन निवडणुकीला स्थगिती घेणार असल्याचं ऐकतोय. म्हणजे विद्यापीठावर दबाव आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

गृहविभागाकडून आडकाठी का आणली जातेय? Combine परीक्षेचा मार्ग खुला करा, अन्यथा पुन्हा एकदा….Rohit Pawar यांचा गृहविभागाला इशारा

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली; Congress शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन, काँग्रेस नेते Rahul Gandhi यांच्या जीवाला धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss