संजय राऊतांचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर हल्लाबोल

संजय राऊतांचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न प्रचंड पेटला आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला या मुद्द्यावरून चांगलंच घेरलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अगदी सहज बोलले, अहमदाबादमध्ये त्यांच्यात चर्चा झाली.. हा प्रश्न एवढ्या हलक्यात घेण्यासारखा आहे का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावा, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “गाजलेला पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आणि गृहमंत्र्यांचा संपर्क जास्त होता. राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले तरी ते गृहमंत्रालयाच्या अधीन येतात. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्त्यांवर गृहमंत्रालय काम पाहतं. त्यांचे राजकीय बॉस हे गृहमंत्रीच (Home Minister) असतात. त्यामुळे त्यांनी घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींऐवजी आपल्या राजकीय बॉसला पत्र लिहिलं आहे.”तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल

आज पुण्यात बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) संपूर्ण कार्य पुणे आणि रायगडातून गेलंय. या बंदची दखल केंद्र, महाराष्ट्र सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी. या बंदचं लोण पसरत गेलं तर हळू हळू संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) बंद होईल. १८ तारखेला महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. महाराष्ट्रातील दैवतांचा अपमान होतोय, त्याची दखल केंद्राला घ्यावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चिघळले असताना अहमदाबाद (Ahmedabad) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांची भेट झाली. या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. या भेटीच्या पद्धतीवरून संजय राऊत यांनी टीका केली.

राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत, बदनामी करत आहेत, धमकी देत आहेत आणि तुम्ही सहज चालता चालता भेटत आहात आणि चर्चा करत आहात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी हे बाहेर तरी सांगू नये.” “ज्या प्रश्नावर लोक ५५-६० वर्षे संघर्ष करत आहेत, लढत आहेत, शहीद होत आहेत, मान-अपमान सहन करत आहेत तो.

हे ही वाचा : 

Pune Bandh पुण्यातील मोर्चात मुस्लिम बांधव शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकरांचे पोस्टर घेऊन सहभागी

Ved Movie Trailer Out बहुप्रतीक्षित ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांची सिमेना पाहण्याची उत्सुकता शिगेला

Samruddhi Mahamarg औरंगाबादहून नागपूरला जाणारी लाल परी ‘या’ तारखेपासून धावणार समृद्धी महामार्गावर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version