Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. तब्बल १०३ दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीने कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

Raigad Pen : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब, ४ तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

ईडीचा नेमका युक्तीवाद काय?

तब्बल १०३ दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

१०३ दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर आले. संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी आले होते. शिवसैनिकांच्या गराड्यातच त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर संजय राऊतांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

राशी भविष्य ११ नोव्हेंबर २०२२, तुमच्या मनातील संशय आणि संभ्रम दूर होण्याची आवश्यकता आहे

राऊतांनी खंत व्यक्त केली

तुरुंगातले हे दिवस आपण कधीही विसरणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. मी चाळीस वर्ष पत्रकारिता करत आहे. यासोबतच ३० वर्ष सामना सारख्या मोठ्या वृत्तपत्राचे मी संपादक राहिलो आहे. ४ वेळा खासदार म्हणून राज्यसभेवर गेलो आहे. अशा व्यक्तीला अटक केली जाते. केंद्रीय तपास यंत्रणेकडून मला अटक करण्यात आली. मात्र मी कायदेशीर लढाई जिंकलो असल्याचा पत्रकाराची संवाद साधताना संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version