कोणतीही कारवाई करा, मी गुडघे टेकणार नाही ; संजय राऊत

सध्या राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सत्तासंघर्ष सुरु आहे.

कोणतीही कारवाई करा, मी गुडघे टेकणार नाही ; संजय राऊत

मुंबई : सध्या राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सत्तासंघर्ष सुरु आहे. यातच काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजपसह इतर नेत्यान कडून टीका करण्यात येत होती. तर दुसरीकडे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दोन वेळा ईडीने समन्स बजावलेला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार निशाना साधलाय. “खोट्या केसेस टाकून अटक करायची असेल तर शिवसैनिक म्हणून सेनेसाठी या कारवाईला सामोरे जाणार. मी कुठेही मला वाचवा म्हणून कुणासमोर गुडघे टेकणार नाही. ईडीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत कोणतीही आक्षेप घेणार नाही. पण, याचा वापर राज्यकीय विरोधकांविरोधात होत आहे”, असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

अर्जुन खोतकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

राऊत म्हणाले, “अर्जुन खोतकर हे जुने सहकारी आहेत. त्यांनी माध्यमांसमोर कोणत्या तणावात आहोत हे सांगितले. कुटुंबीयांवर आणि त्यांच्यावर कोणता दबाव आहे हेदेखील स्पष्टपणे सांगितले. कठीण काळात सुरक्षित होण्यासाठी पावले उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. खोतकर यांनी हिंदुत्वलाला बदनाम केले नाही, यासाठी अभिनंदन करतो असे राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा : 

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतेले निर्णय लवकर कृतीत उतरवावे : अजित पवार

‘महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही’

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या खेळखंडोबा केला आहे. या गटाने फुटून महाराष्ट्राला काय दिले? त्यांना दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यावा लागेल. आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असा दावाही राऊत यांनी केला आहे.

ग्रीको-रोमन अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सूरज वशिष्ठने बाजी मारली, 32 वर्षांनी जिंकून दिले गोल्ड मेडल

Exit mobile version