spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर संजय राऊतांची टीका, पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत …

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मुंबईत दौरा होणार आहे. पंतप्रधानांचा गेल्या महिनाभरतील हा दुसरा दौरा असणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांसाठी मुंबई दौऱ्यावर असणार आहे. हा या दौऱ्यामध्ये मुंबईतील अनेक विकास कामांना डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. तर विरोधकांचे म्हणणे आहे की “आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मोदींचे मुंबई दौरे होत आहे” अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आज पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की “जोपर्यंत महानगर पालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत राहू शकतो. कारण पालिका जिंकण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातले भाजपा आणि मिंधे गटाचे लोक असमर्थ आहेत. ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा इतर राज्यांत त्यांनी लावला तसा आख्खा देश जरी इथे लावला, तरी मुंबई महानगर पालिका शिवसेना जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळेच आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय”, असं संजय राऊत म्हणाले. “ते आहेत देशाचे पंतप्रधान आणि लक्ष कुठंय तर मुंबई महानगर पालिकेवर. याचा अर्थ इथले सगळे भाजपा आणि मिंधे गटाचे नेते नाकर्ते आहेत. म्हणून पंतप्रधानांना बोलवलं आहे. कदाचित पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत घर घेऊन राहतील. राजभवनात राहतील”, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लागावाला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की “मला पंतप्रधानांवर फार टीका करायची नाहीये. मी करू शकतो. पण दिल्लीत संसद सुरू असताना, अनेक महत्त्वाचे विषय सुरू असताना, अदाणीसारख्या विषयांवर विरोधकांनी घेरलं असताना पंतप्रधान मुंबईत येत आहेत. वंदे भारत एक निमित्त आहे. पंतप्रधानांना मुंबई महानगर पालिका जिंकायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आम्हीही इथे तयारीत आहोत”, असे म्हणत संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांना आव्हान दिले आहे.

हे ही वाचा : 

Teddy Day 2023, तुमच्या प्रियकराला द्या टेडी डे च्या खास शुभेच्छा…!

Teddy day2023, तुम्हाला माहित आहे का, पहिला टेडी कुठे बनवला गेला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss