Sanjay Raut यांचे थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र, २० जून जागतिक गद्दार दिन…

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संजय राऊत यांनी थेट आजचा दिवस म्हणजे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा अशी मागणी केली आहे.

Sanjay Raut यांचे थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र, २० जून जागतिक गद्दार दिन…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वृक्ष हे पूर्ण झाले आहे. आजच्याच दिवशी एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून काढता पाय घेतला आणि त्यामुळे शिंदे गट तयार झाला. शिवसेना पक्षात उभी फूट पडली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच दिनांक २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केला. आज या संपूर्ण घटनेला १ वर्ष पूर्ण झाले आहे. याच मुद्याला धरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संजय राऊत यांनी थेट आजचा दिवस म्हणजे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा अशी मागणी केली आहे.

या संदर्भात संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करत हे पत्र शेअर केले आहे. २० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी ५० खोके (५०कोटी) रुपये घेतले त्यामुळे दिनांक २० जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे (यूबीटी) प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, या मागणी पत्रावर महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या सह्या गोळा करून ते संयुक्त राष्ट्राला पाठवू. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, जगाने विश्वासघाताच्या अनेक घटना पाहिल्या आहेत आणि गेल्या वर्षी महाराष्ट्रातील जनतेसोबत हे घडले. आमचा पक्ष सत्तेवर आल्यावर २० जून हा गद्दर दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे ते म्हणाले. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अशीच मागणी केली होती.

शेवटी देशद्रोही कोण? –

गेल्या वर्षी २० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. या बंडात खासदारांचाही सहभाग होता. शिवसेनेने (UBT) त्याला देशद्रोही म्हटले आहे. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी १९ जून रोजी झालेल्या स्थापना दिनाच्या सभेत सांगितले होते की, महाराष्ट्रात काही लोक इतरांच्या वडिलांची चोरी करतात. ते देशद्रोही आहेत.

हे ही वाचा:

मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला राम राम प्रवेश शिवसेनेत प्रवेश

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version