spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जेलमधून बाहेर पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘आम्ही लढणारे आहोत…

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांची आज अखेर जेलमधून सुटका झालीय. संजय राऊत यांची सध्या प्रकृती बरी नाहीय. त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं.

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांची आज अखेर जेलमधून सुटका झालीय. संजय राऊत यांची सध्या प्रकृती बरी नाहीय. त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं. पण यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. जेलमधून बाहेर आल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच न्यायालयावरचा विश्वास वाढल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

“एक आनंद आहे. न्यायालयावरचा विश्वास वाढला. न्यायालयाचं जे निरीक्षण आहे ते आम्ही सांगत होतो”, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊतांनी जेलमधून बाहेर पडल्यानंतर दिली. तसेच ते म्हणाले आहेत , आलोय बाहेर, आता बघू, आम्ही लढणारे आहोत अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरवली आहे असंही ते म्हणाले. “माझी तब्येत जरा बरी नाही. मी नक्की माध्यमांशी बोलेन. पण मला बरं वाटलं की बोलेन”, असं संजय राऊतांनी सांगितलं. तसेच आपल्या कार्यकर्त्यांनी काय कार्यक्रम ठरवालय ते पाहून तिथे जाऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संजय राऊत यांना आज विशेष पीएमएलए कोर्टाने मोठा दिलासा दिला. कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. यावेळी ईडीच्या वकिलांनी त्यांच्या जामीनाला विरोध केला. पण कोर्टाने त्यांचा विरोध फेटाळत संजय राऊतांचा जामीन मंजूर केला. संजय राऊत हे लोकप्रतिनिधी आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत. असं असताना गेल्या १०२ दिवसांपासून ते जेलमध्ये होते.

विशेष म्हणजे विशेष पीएलए कोर्टाने आपल्या जामीन ऑर्डरमध्ये ईडीबद्दल मोठे खुलासे केले आहेत. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर होती, असं स्पष्ट विशेष पीएलए कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर आहे. ईडीने प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक केली नाही.अनेक साक्षीदारांच्या जबाबातून वाधवान यांची मुख्य भूमिका समोर येतेय. मात्र प्रवीण राऊत यांना दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली, असं ऑर्डरमध्ये कोर्टाने म्हटलं आहे.

हे ही वाचा :

Sanjay Raut Bail: कोर्टाने EDला झापलं; ईडीने मर्जीने आरोपी निवडले

Sanjay Raut Bail : संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले ; आदित्य ठाकरे

राऊतांच्या जामीनावर रोहीत पवारांच्या ट्विटची चर्चा तर सुषमा अंधारेंनी दिली पहिली प्रतिक्रिया’ ‘टायगर इज बॅक’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss