spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांचा जोरदार हल्लबोल, गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापल्याच चित्र दिसून येत आहे. अश्यातच आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा हा साधला आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापल्याच चित्र दिसून येत आहे. अश्यातच आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा हा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल करत एक मागणी केली आहे. “मनोज जरांगे पाटील यांच्यामागचा बोलवता धनी कोण? हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. हे सर्व घडवणारे कोण आहेत? सरकारचा हिस्सा आहेत का? महाराष्ट्रात अस्थितरता निर्माण करुन वेगळं राजकारण करायच आहे का? हे तुम्हाला माहित नसेल, मग गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, “मनोज जरांगे पाटील सध्या जे बोलतायत, ती भाषा त्यांनी भाजपाकडून घेतली असेल. जरांगे पाटील साधे गावातील कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भाषेकडे जाऊ नका, भावना समजून घ्या. भाजपामधले सुशिक्षित, कडक इस्त्रीचे नेते, त्यांच्या भाषेकडे लक्ष द्या. एकमेकाला संपवायची, खतम करण्याची भाषा आहे. भाषेची संस्कृती, संस्कार कोणी बिघडवला असेल, तर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या एका टोळीने बिघडवलाय. फडणवीस यांच्याकडे सूत्र गेल्यानंतर महाराष्ट्राची अवस्था खराब झाली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“मनोज जरांगे पाटील यांचे फोन टॅप केले जात असतील, याबाबतीत रश्मी शुक्ला अनुभवी आहेत. त्यासाठी त्यांना बसवलय. रश्मी शुक्ला डीजी यांच्यापेक्षा हे जास्त कोणाला माहिती असेल? गृहमंत्र्यांनी अनुभवी डीजींशी चर्चा करावी. कोण कोणाला फोन करतय? ते आपल्या सरकारमध्ये आहेत का? ते महाराष्ट्राला पेटवायला निघाले आहेत का? ही माहिती नसेल, तर हे राज्याच दुर्देव आहे” असं संजय राऊत म्हणाले. “अजित पवारांनी लिहिलं, विकासासाठी ते मोदींकडे गेले. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना समुद्रात डुबकी मारुन स्कूबा डायव्हींग कराव लागेल. अजित पवार कदाचित धरणात उडी मारतील, तिघेही मोदींचे फॉलोअर्स आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केला.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss