संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, नरेश म्हस्केचा हल्लबोल

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना नक्की कोणाची याचा निर्णय दिला आणि हा निर्णयाने शिंदे गटाला (Shinde Group) शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आता पर्यंत २०० कोटींचा व्यवहार झाला आहे असे आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. हा प्राथमिक आकडा १०० टक्के सत्य आहे असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, नरेश म्हस्केचा हल्लबोल

संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, नरेश म्हस्केचा हल्लबोल

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना नक्की कोणाची याचा निर्णय दिला आणि हा निर्णयाने शिंदे गटाला (Shinde Group) शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आता पर्यंत २०० कोटींचा व्यवहार झाला आहे असे आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. हा प्राथमिक आकडा १०० टक्के सत्य आहे असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या दाव्यानंतर राज्यामधले राजकारण संतप्त झाले आहे. संतप्त होऊन शिंदे गटातील शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न त्यांना विचारावे वाटते असं ते म्हणाले आहे.

संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न नरेश म्हस्के यांनी संतप्त होऊन विचारला आहे. पुढे ते म्हणाले, असा विचारावा लागतो रात्रीची भांग असेल, रात्रीच्या गावठी ब्रँड असेल कदाचित त्यांच्या बरळण्यावर त्याचा परिणाम झाला आहे मी वारंवार सांगत आलो आहे. आमच्या ठाण्यामध्ये प्रसिद्ध रुग्णालय आहे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे. त्यांनी एक सुपारी घेतली होती, शिवसेना संपवण्याची. राष्ट्रवादीकडून असेल कोण, शरद पवार साहेबांनी त्यांना सुपारी दिली होती. शिवसेना संपवण्याची आणि त्यांनी त्यांचं काम फत्ते केलेलं आहे. लोकशाहीमध्ये न्याय जिवंत आहे आणि आता त्यांच्या विरोधात निर्णय दिला की, न्यायालयावरती टीका करणार.” असे ते म्हणाले

नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावले. शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूका लढवल्या आणि त्यानंतर आपल्या खुर्ची करता त्यांच्या विरोधात निवडणूका लढवल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर एक मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून आम्ही भाजपला बाजूला सोडले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सोबत युती केली आणि आम्हाला बाजूला केलं आणि आम्ही त्यांच्या विरोधात लढलो अन त्यांच्या बरोबर सत्तेत बसलो हे महित शाह बरोबर बोलले असे नरेश मस्के म्हणाले.

हे ही वाचा :

Amit Shah In Kolhapur Live, कोल्हापुरातून अमित शाह लाईव्ह

Uddhav Thackeray Live, उत्तर भारतीय नागरिकांसोबत ठाकरेंचा संवाद, मी भाजपला सोडलं, हिंदुत्व…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version