spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांचे नवे ट्विट,PM Narendta Modi यांच्या मुख्य द्वारावर डिग्रीची फ्रेम लटकवा

उद्धव ठाकरे यांनीं अनेक विषयांचा उल्लेख केला मात्र त्यातील एक मुद्दा म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय भर सभेत मांडला. आणि हा मुद्दा महाविकास आघाडी कडून चांगलाच उचलून धरला. कालच्या झालेल्या सभेनंतर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींना ट्विटच्या माध्यमातून टार्गेट केलं आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगर परिसरात घेतलेल्या वज्रमूठ सभेला अलोट गर्दी जमा झाली होती. खूप जनसमुदाय जमा झाला होता.उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिल्या नंतर त्यांना अलोट गर्दीने चांगला प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीचा विषय असो असा नारा तर उद्धव साहेब आज बडो हं तुम्हारा साथ हे अशा घोषणा ऐकायला मिळाल्या. या सभेत उद्धव ठाकरे यांनीं अनेक विषयांचा उल्लेख केला मात्र त्यातील एक मुद्दा म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय भर सभेत मांडला. आणि हा मुद्दा महाविकास आघाडी कडून चांगलाच उचलून धरला. कालच्या झालेल्या सभेनंतर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींना ट्विटच्या माध्यमातून टार्गेट केलं आहे. गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendta Modi) यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा धरला ठेवला आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच बंगालमध्ये जी दंगल घडत आहे ती दंगल भाजपकडून स्पॉन्सर केली जात आहे असे मोठे वक्तव्य देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अशी माहिती त्यांनी सकाळी सकाळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.

खरं तर हा मुद्दा आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी काढला होता, मात्र आता याच मुद्द्याला हात घालत उद्धव ठाकरे यांनी देखील भर सभेत विषय मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री नेमकी काय आहे, ती सार्वजनिक करा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकाराखाली केली होती. या मागणीला सात वर्षांपूर्वीचं आहे. परंतु त्कालीन निवडणूक आयोगाने दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला ही डिग्री सार्वजनिक करण्यासंबंधीचे आदेशही दिले होते. मात्र गुजरात हायकोर्टाने नुकताच यासंबंधी निर्णय दिला असून तत्कालीन निवडणूक आयुक्तांनी दिलेला आदेश रद्द ठरवला. तर मोदींची डिग्री मागणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मात्र आम आदमी पार्टीसह देशभरातील विरोधकांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

काल संभाजीनगर येथे येथील सभेत हाच मुद्दा उचलून धरल्यामुळे संजय राऊत यांनी देखील पंतप्रधानांना डिवचणारे ट्विट केले आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये एका डिग्रीचा फोटो शेअर केला आहे. आणि ही डिग्री संसदभवनाच्या मेनगेटवर टांगा,असं वक्तव्य राऊत यांनी केला आहे. तसेच त्या डिग्रीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असून एंटायर पॉलिटिकल सायन्स असं विषयाचं नाव लिहिलं आहे. त्यामुळे हे ट्विट आणि त्या डिग्रीचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावरून राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की , आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी यांची ही डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतायत. पण मी म्हणतो- ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे. नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर या डिग्रीची फ्रेम करून लटकवली पाहिजे. यामुळे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत. आणि त्यामुळे नव्या वादाला आता फुटणार नाही आणि त्यामुळे देशात शांतता राखली जाईल. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा : 

बंगालमधील दंगल भाजपकडून (sponcer) संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य 

MVA Vajramuth Sabha, हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, अजित पवारांचं भाजपला आव्हान

Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha, सरकार घाबरलंय, म्हणून यात्रा काढतंय, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss