‘या’ गुन्ह्याच्या तक्रारीमुळे होणार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ…

धमकी देणाऱ्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे...

‘या’ गुन्ह्याच्या तक्रारीमुळे होणार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ…

राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरावर आज सकाळी सात वाजता ईडीच्या पथकाने धाड टाकली असून सध्या हे पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरुद्ध ही तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे अशी तक्रार स्वप्न पाटकर यांनी वाकोला पोलिसांना केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना धमकी आणि शिवीगाळ होत असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यातील आवाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा असल्याची चर्चा सुरू होती. या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान स्वप्न पाटकर यांची तक्रार दाखल केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेत स्वप्ना पाटकर यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आज संध्याकाळपर्यंत वाकोला पोलीस स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

नेमकी काय तक्रार केली स्वप्ना पाटकर यांनी?

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळ्यासंबंधी सध्या संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याविरुद्ध दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी स्वप्ना पाटकर यांना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच “धमकी देणाऱ्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे व घरी येणाऱ्या वृत्तपत्रातून मला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे”, असे पाटकर यांनी सांगितले.

Exit mobile version