हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानच पडेल, राऊतांच्या हल्लाबोल

हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानच पडेल, राऊतांच्या हल्लाबोल

नागपूरच्या अधिवेशनात राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत, त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरु आहे. त्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी आरोप सुरु आहेत. हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडेल असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार टीका केली. सुशांक सिंग प्रकरणी राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं. आमच्यावर कितीही आरोप करा, माणसं फोडो, माणसं फोडा शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाही. मागे हटणार नाही. जे हा खेळ करतायेत त्यांचं राज्य औटघटकेच असल्याचे राऊत म्हणाले.

हेही वाचा : 

रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?, पुन्हा ‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान

नाशिकमधून ठाकरे गटाला धक्का

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला. संजय राऊत यांची पाठ फिरताच ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी (Bhau Chaudhary) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाऊ चौधरी हे संजय राऊत यांच्या जवळचे मानले जात होते. नाशिक संपर्कप्रमुख म्हणून ते काम पाहत होते. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतरही भाऊ चौधरी हे त्यांच्या सोबत होते. मात्र आता भाऊ चौधरी हे ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Coronavirus ‘गर्दीच्या ठिकाणी मास्क अवश्य लावा’, चीनमुळे आता भारतातही सरकार अलर्ट मोडवर

राऊतांचे ट्विट

“शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

Exit mobile version