Sanjay Raut Bail : संजय राऊतांना दिलासा, ईडीची स्थगितीची मागणी कोर्टानं फेटाळली

Sanjay Raut Bail : संजय राऊतांना दिलासा, ईडीची स्थगितीची मागणी कोर्टानं फेटाळली

Sanjay Raut ED Raid

संजय राऊत यांना तब्बल १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. ईडीच्या या विनंतीवर दुपारी ३ वाजता पीएमएलए हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार की त्यांचा मुक्काम वाढणार? याबाबत चर्चा सुरु झाली होती. मात्र जामीनावर काही काळ स्थगिती आणायची मागणी कोर्टानं फेटाळली आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut Bail : संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले ; आदित्य ठाकरे

न्या. एम. जी. देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला तसेच म्हटलं की, “निकालाला स्थगिती देण्याची कायद्यात कुठलीही तरतूद नाही आणि मुंबई सत्र न्यायालयाला निकाला स्थगिती देण्याचे पीएमएलए अंतर्गत अधिकार नाहीत, ते हायकोर्टाला अधिकार आहेत. न्या. देशपांडे यांनी आपल्या निर्णयावर ईडीनं युक्तीवाद केल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती.

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले होते. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.

Har Har Mahadev चे शो बंद पाडल्यास खळ्ळखट्याकचा इशारा; मनसे आक्रमक

अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.

Exit mobile version