संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना प्रतिउत्तर

शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि शिंदे गट या दोन गटांमध्ये काळ घडलेल्या प्रकरण वरून राजकारणात नवीन वाद पसरला आहे. उद्धव बाळासाहेब गटाच्या रोशनी शिंदे याना मारहाण केल्यानंतर संपदा हॉस्पिटल या ठिकाणी उद्धव ठाकरे कुटुंब समवेत भेटायला गेले होते. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती.

संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना प्रतिउत्तर

शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि शिंदे गट या दोन गटांमध्ये काळ घडलेल्या प्रकरण वरून राजकारणात नवीन वाद पसरला आहे. उद्धव बाळासाहेब गटाच्या रोशनी शिंदे याना मारहाण केल्यानंतर संपदा हॉस्पिटल या ठिकाणी उद्धव ठाकरे कुटुंब समवेत भेटायला गेले होते. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या राज्याला मिळालेले उपमुख्यमंत्री हे फडतूस आहे असा उल्लेख यावेळी त्यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी कोणताही विलंब न करता त्यांना चांगलेच प्रतिउत्तर दिले आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझा उल्लेख फडतूस असा केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मी फडतूस नाही तर काडतूस आहे, असं वक्तव्य केले. दरम्यान, फडणवीसांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या वादातून एकमेकांवर ताशेरे उठवले जात होते.

सध्याचा राजकारणात वादातून वाद निमार्ण होत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिउत्तरला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले संजय रॅट म्हणाले, तुमचं खरं काडतूस हे ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि सीबीआय (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) आहे.संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील, डॉ. मिंधे यांच्या टोळीतील गुंडांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केली. या टोळीने अत्यंत निर्घृण आणि अमानुषपणे हा हल्ला केला, त्यात रोशनी शिंदे जखमी झाल्या. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु हा सर्व प्रकार होत असताना पोलीस बघत होते. म्हणून उद्धव ठाकरे गृहमंत्र्यांना फडतूस म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटलं आहे. पण उद्धव ठाकरे केवळ फडतूस म्हणाले. फडतूसचा अर्थ बेकार, अर्थहीन, युजलेस आणि बिनकामाचे असा होतो. ते स्वतःला काडतूस म्हणाले, पण अशी काडतुसं उडत नाहीत. तुमचं खरं काडतूस हे सीबीआय आणि ईडी आहे. म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली आहे. तुम्ही ईडी आणि सीबीआयला बाजूला ठेवून या. मग आम्ही तुम्हाला दाखवतो काडतूस कुठे घुसतं.

हे ही वाचा : 

‘घर बंदूक बिरयानी’ नंतर नागराज मंजुळे झळकणार या सिनेमात

डोनाल्ड ट्रम्प भाजप प्रवेश करतील, ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील

IPL2023, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version