संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हे सरकार लादलेलं आहे. सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची ते पाठराखण करत आहेत. सध्या ते जी सारवासारव करत आहेत, ते मनातून करत नाहीयेत. एका अपरिहार्यतेतून ते हे सगळं करत आहेत, असं मोठं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. शिंदे गटातील (CM Eknath Shinde) भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घालण्यात भाजपाला कठीण जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत यांच्याविरोधात भूखंड घोटाळ्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नागपुरातील एनआयटी भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत.

“कधीकाळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते. तेव्हा त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. एकनाथ खडसे (Eknath Khadse) असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे इतर सहकारी यांनी त्या काळी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आणली. मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. पण आज सत्तेत असताना त्यांना विरोधी पक्ष काढत असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाकेही वाटत नाहीत. एवढे बदलले आमचे देवेंद्रजी?” असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला आहे. आम्ही म्हणालो होतो की आम्ही काही बॉम्ब फोडू. काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की वाती तयार आहेत. अजून अधिवेशन संपलेलं नाही. मुख्य म्हणजे आमच्यासाठी यावेळेला सीमाप्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या बॉम्बस्फोटात सीमाप्रश्नाबाबतचा आम्हाला हवा असलेला ठराव वाहून जाऊ नये आणि सरकारला कारण मिळू नये, यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकारण सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवर संजय राऊतांनी टीकास्र सोडलं. “ही सारवासारव आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचं काम फडणवीस मनापासून करत असतील, असं मला वाटत नाही. त्यांची काहीतरी मजबुरी आहे. त्यांच्यावर हे लादलेलं सरकार आहे. आम्हाला फडणवीसांविषयी पूर्ण सहानुभूती आहे”, असं राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजाची हक्कालपट्टी, दिली पहिली प्रतिक्रिया

Salman Khan च्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चा होतेय, एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version