संजय राऊतांचा मुक्काम पुन्हा एकदा १९ सप्टेंबरपर्यंत वाढला

पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Land Scam Case) ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत ( Judicial Custody) वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे.

संजय राऊतांचा मुक्काम पुन्हा एकदा १९ सप्टेंबरपर्यंत वाढला

पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Land Scam Case) ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज PMLA कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली.

ईडीनं संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी थेट हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीनं केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असा आरोप ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.

पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. ८ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती. आज पुन्हा त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यांचीही चौकशी करण्यात आली. आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

हे ही वाचा :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई येथील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

लखनौ येथील हॉटेलमध्ये अग्नितांडव

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version