संजय राउतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढणार का?, न्यायालयात आज सुनावणी

संजय राउतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढणार का?, न्यायालयात आज सुनावणी

मुंबई : मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. रविवारी अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर मध्यरात्री ईडीने संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना 4 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या कोठडीची मुदत आज संपत आहे. संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा ईडी संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे.

ईडी वकिलांचे आरोप

संजय राऊत यांचा पत्राचाळ आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट सबंध असल्याचा आरोप ईडीने केला. संजय राऊतांचे बंधू प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असे ईडीने न्यायालयात समोर मांडले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचे देखील नाव आले असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Shivsena VS Shinde : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाचा आज दुसरा पेच

Exit mobile version