संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडी कडून अटक करण्यात आले होते. न्यायालयाने पुन्हा एकदा 4 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत ईडीने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी ईडी कोठडीच्या व्यवस्थेबाबत न्यायालयाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनीही धमक्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. पण ते कोठडीत असताना ते धमक्या कसे देऊ शकतात असा प्रतिप्रश्न न्यायालयाने त्यांना केला होता. त्यानंतर अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नीच्या अकाऊंटवर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती.

हेही वाचा : 

संजय राउतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढणार का?, न्यायालयात आज सुनावणी

Exit mobile version