spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, अजामीनपत्र वॉरंट जारी

काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Uddhav Balasaheb Thackeray party) एक मागून एक धक्के बसत आहेत. आज नागपूरमधले अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात आज अजामीनपत्र वॉरंट (Non-bailable warrant) जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात (Shivdi Court) पुढची सुनावणी येत्या २४ जानेवारीला होणार आहे. भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somayya) यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात धाव घेतली आहे.

दरम्यान संजय राऊतांविरोधात अजामीनपत्र जारी करण्याची मागणी मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी शिवडी कोर्टात केली. संजय राऊत यांच्याविरोधातील मानहानीच्या (Defamation) खटल्याच्या सुनावणीला संजय राऊत वारंवार उपस्थित न राहिल्याने ही मागणी करण्यात आली. या सुनावणीला किरीट आणि मेधा सोमय्या दोघंही कोर्टात हजर होते, मात्र संजय राऊत सातत्याने गैरहजर राहिले.

काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊत यांना पुन्हा जेल ची वारी घडवणार असं विधान केलं होत. तर आता संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र जाहीर करण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी येथील दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. १०० कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली मोठ्या प्रमाणत बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता.

हे ही वाचा:

स्पेशल अधिकार नको समान हक्क हवा,समलैंगिक विवाहाच्या मुद्यावर केंद्र सरकारने मागितला वेळ

ठाकरे गटाच्या ५० पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री म्हणाले, हाच ट्रेंड येणाऱ्या निवडणुकीतही राहणार

राजवस्त्रे बाजूला काढा आणि या, मग दाखवतो, राऊतांचा राणेंना इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss